अवैध दारू जोमात, उत्पादन शुल्क कोमात! एकाच आठवड्यात तब्बल १२९ जणांवर कारवाई

सुषेन जाधव
Saturday, 28 November 2020

औरंगाबाद  शहरात दर दिवशी दोन ते तीन अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाया करत आहेत. अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले होते.

औरंगाबाद : शहरात दर दिवशी दोन ते तीन अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाया करत आहेत. अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी मागील आठवडाभरात तब्बल १२९ कारवाया केल्या आहेत. असे असले तरी दारु विक्रीसंदर्भात निर्माती करण्यात आलेल्या राज्य उत्पाद शुल्क विभागाने मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवण्याची भुमिका घेतली आहे.

शहरात बेकायदेशिर रित्या दारू विक्री होत असल्याने अनेक गुन्हेगार हे अशा ठिकाणी बसून गुन्हेगारीला खत पाणी घालत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार शहरातील आणि परिसरातील हॉटेल, ढाबे या ठिकाणी दारुची बेकायदा विक्रीवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. माहिती मिळलाच अशा बेकायदा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. गुरुवारी एका महिलेसह दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

मुकुंदवाडी येथील भाजीमंडी परिसरात एक युवक देशी दारुची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी अश्वलिंग सोमनाथ होनराव यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्याआधारे होनराव हे पथकास गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सूमारास भाजीमंडी परिसरात गेले. त्यावेळी त्यांना कृष्णा भास्कर पवार (२४, रा. संजयनगर, गल्ली क्र. १५, मुकुंदवाडी) याच्या ताब्यातून एका गोणीत दडवून ठेवलेला २ हजार ४९६ रुपये किमंतीचा देशी दारुचा साठा आढळून आला असून पोलिसांनी साठा जप्त केला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांची वाढती संख्या
प्रामूख्याने देशी दारुची अवैध विक्री करण्यात महिलांचा समावेश दिसून येत आहे. आणखी दुसऱ्या घटनेत क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत पांडूरंग वाघमारे हे गुरुवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत असतानाच जुना मोंढा येथील जाफरगेट येथे त्यांना एक महिला देशी दारुची बेकायदा विक्री करीत असल्याचे आढ‌ळ‌ून आले. त्या महिलेच्या ताब्यातून पोलिसांना देशी दारुच्या आठ बाटल्या आढळून आल्या असून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत तुर्काबाद येथे एका हॉटेलमध्येत हॉटेलचालक हा देशी दारुची बेकायदा विक्री करताना आढळून आला. वाळूज पोलिसांनी कारवाई करत हॉटेलचालक पंढरीनाथ प्रेमभरे याच्या विरोधात कारवाई करत त्याच्या ताब्यातून देशी दारुचा अवैध साठा जप्त केला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illcit Liquor Business High, But Excise Duty Collection Down Aurangabad News