जिल्‍ह्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - कृषीमंत्री दादा भुसे

प्रकाश बनकर
Saturday, 26 September 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यापुर्वी कन्नड तालुक्यातील काही गावात पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्यानी पाहाणी केली. या बैठकीत रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद : जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी पाऊसापेक्षा १६० टक्के जास्त पाऊस झाला आहे. आज कन्नड तालुक्यातील काही गावात  प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहाणी केली. यात बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतात पणी सचले,काही ठिकाणी दलदलची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.२६) माध्यमांना सांगितले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यापुर्वी कन्नड तालुक्यातील काही गावात पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्यानी पाहाणी केली. या बैठकीत रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले,  जिल्ह्यात तातडीने पंचनामे सादर करीत संपुर्ण गोषावारा तयार केल्यानंतर नुकसानीचे क्षेत्र, पिक यांचा अहवाल तयार करुन शासना समोर सादर ठेवला जाणार आहे. शासनाच्या पातळीवर शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल हे पाहणायात येणार आहे.

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

यासह काही शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. त्या विमा कंपन्यांनीही या संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत.  पंचनामचा तयार झालेला संपुर्ण अहवाल केंद्र सरकारकडेही  सादर केला जाणार आहे. केंद्राला आवश्‍यकात असेल तर, पथक पाठवून  प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती करण्यात येणार आहे. यामुळे पाहिले तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, कोणत्या पिकाचे नुकसान झाले ते समोर आहे. राज्यात मंत्री आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करत  असल्याचेही कुषीमंत्री भुसे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immediately Complete panchanama of Damaged Crops in the district Agriculture Minister Dada Bhuse Aurangabad News