esakal | स्वतःच्या विहीरीतील पाणी दिले, आता मोबादल्यासाठी शेतकऱ्यांची होतेय पायपीट
sakal

बोलून बातमी शोधा

Well

उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात अधिग्रहण व टँकरने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. गतवर्षीचे साठ लाख तर यंदाचे सतरा लाख असे ७७ लाख रुपये थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

स्वतःच्या विहीरीतील पाणी दिले, आता मोबादल्यासाठी शेतकऱ्यांची होतेय पायपीट

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद): उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात अधिग्रहण व टँकरने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. गतवर्षीचे साठ लाख तर यंदाचे सतरा लाख असे ७७ लाख रुपये थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

हेही वाचा- कोविड केंद्राला लावले कुलूप, कोरोनाच्या २२ रुग्णांचे रात्रभर झाले हाल

उमरगा तालुक्यात पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्याने नागरीकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यंदा २३ एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली होती. ती २३ जुलैपर्यंत सुरुच होती. पाऊस झाल्याने प्रशासनाने २४ जुलैपासुन चाळीस अधिग्रहण व पाच टँकर बंद केले. परंतू टंचाईच्या झळा असल्याने बेळंबला दोन टँकर व बोरीला दोन अधिग्रहणाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे वाचलंत का?- मी जप केल्यामुळे कोरोनाकाळात भारतात अमेरिकेसारखी स्थिती नाही, खैरेंचा अजब दावा  

दरम्यान यंदाच्या टंचाईच्या काळातील अधिग्रहणाच्या मोबादलाचा एक रूपयाही अद्याप तहसील कार्यालयाला प्राप्त झालेला नाही. शिवाय गतवर्षीच्या अधिग्रहणाचे साठ लाख रूपये थकित आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीतील पिकाला पाणी देण्याचे थांबवून ग्रामस्थांची तहान भागविली.

मात्र मोबादला मागणीसाठी प्रशासनाकडे घसा कोरडा करेपर्यंत प्रयत्न करुनही उपयोग होत नसल्याने शेतकरी व्यथित झाला आहे. जिल्हा प्रशासनाने अधिग्रहणाची थकित रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचाः पाचशे रुपये दंडा सोबत मास्क ही देणार

loading image
go to top