घाटीत इरकॉन परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बारा वैद्यकीय शिक्षकांचा सत्कार 

ircon gmch aurangabad
ircon gmch aurangabad

औरंगाबाद : घाटीत गेल्या काही वर्षांत अनेक सुधारणा झाल्या. या संस्थेच्या अद्ययावत वेबसाईटवरून नवे स्वरूप लक्षात येते. इरकॉन ही परिषद वैद्यकीय आंतरशाखीय संशोधनासाठी महत्त्वाची असून, यामध्ये सातत्य कायम आहे. संस्थेची प्रगती होताना विद्यार्थ्यांवर तिचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत एमजीएम वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी यांनी व्यक्त केले.

बाराव्या इरकॉन परिषदेचे शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) महात्मा गांधी सभागृहात डॉ. दळवी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, शासकीय दंत महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे, डॉ. जयश्री तोडकर, उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, डॉ. सुधीर चौधरी, आयोजक डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, वैद्यकीय अधीक्षक सुरेश हरबडे यांची उपस्थिती होती.

आयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो. दररोज नवीन माहिती अपडेट करणे काळाची गरज असते. नव्य-नव्या आव्हानांना सामोरे जाताना ते ज्ञान उपयोगी पडेल असा विश्‍वास प्रख्यात बेरीयाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. अनिल जोशी, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. मंगला बोरकर, डॉ. ज्योती बजाज-इरावणे, डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. अदिती लिंगायत, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत सोनवणे, डॉ. अजय वरे, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. राजश्री सोनवणे, डॉ. अमोल जोशी, डॉ. प्रशांत तितरे, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. अश्‍फाक सय्यद, डॉ. वैशाली उणे यांच्यासह डॉक्‍टर व पीजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अंजली दहीफळे, डॉ. रश्‍मी बंगाली, डॉ. प्रभा खैरे, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. शैलजा राव यांनी केले. तर प्रास्ताविक आयोजक डॉ. वर्षा रोटे कागिनाळकर, डॉ. मोहन डोईबळे यांनी केले. 
हेही वाचा -प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

शिक्षकांच्या अनुपस्थितीची  खंत ः डॉ. कैलास झिने  
दोन वर्षांतून एकदा इरकॉन परिषद होते. घाटीत दोनशेहून अधिक वैद्यकीय शिक्षक आहेत. मात्र, परिषदेला वैद्यकीय शिक्षकांची उपस्थिती गेल्या दोन परिषदांपासून खालावत आहे. हा अंतर्मुख होण्याचा विषय असल्याचे सांगत अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी खेद व्यक्त करत आयोजनाचे कौतुक केले. 

अडचणींमुळे प्रगतीला वाव मिळतो ः डॉ. पी. वाय. मुळे 
डॉक्‍टरांनी आयुष्यभर विद्यार्थी असावे. मी 22 जून 1973 ला इथे घाटीत जॉईन झालो होतो. मी इथे शिकलो याचा मला अभिमान आहे. घाटीत येणाऱ्या अडचणीवर मात करत शिकताना केलेल्या प्रवासातून आपण बेस्ट संस्थेत शिकल्याचा अभिमान नक्कीच वाटल्याशिवाय राहत नाही. तो आनंद आहेच, शिवाय ज्या विभागात काम केले त्याचे कामही दिवसेंदिवस उत्तमोत्तम चालल्याचे दिसते त्याचाही आनंद आहेच. अशा शब्दात ज्येष्ठ फिजिशियन डॉ. पी. वाय. मुळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

बारा वैद्यकीय शिक्षकांचा सत्कार 
माजी अधिष्ठाता डॉ. शशांक दळवी, डॉ. छाया दिवाण, डॉ. के. एस. भोपळे, डॉ. ऊर्जिता झिंगाडे, डॉ. गोपाल नघाते, माजी विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, डॉ. अजित दामले, डॉ. प्रकाश खंडेलवाल, डॉ. रुता बोरगावकर, डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. डी. व्ही. मुळे आणि पी. वाय. मुळे यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com