राज्यात कोविड टेस्ट लॅबची संख्या जाणार शंभरावर : अमित देशमुख

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

 

आरोग्य विभागात होणार कंत्राटी भरती,  खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या  विभागीय आयुक्तांना सूचना 

औरंगाबाद : राज्यात कोविडचे नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत. कोविड संसर्ग राज्यात आल्यानंतर शंभर दिवसांत आतापर्यंत ८५ कोविड टेस्टिंग लॅब तयार करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत राज्यात देशातील सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत. आता लॅब वाढविण्यात येत असून यांची संख्या शंभरावर जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता. सहा) पत्रकार परिषदेत दिली. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी आज कोविड-१९ बाबत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यात गावपातळीवर कोरोनाच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गावपातळीवर चाचणी होत असल्याने त्याचे चांगले परिणामही येत आहेत. शहरात सुरवातीला कोरोनामुळे मृत्युदर अधिक होता, मात्र प्रशासन, महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे मृत्युदर खालावला आहे. 

बापरे... अचानक का वाढला औरंगाबादेत मृत्यूदर 

प्रशासनातर्फे लागण झालेल्यास तात्पुरते शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येतात. यात खासगी क्षेत्रातील रुग्णालयांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्यांकडे शासनाचे लक्ष आहे. राज्य शासनाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये चाचणी उपचारासाठी मोफत सुविधा देत आहेत. सुरवातीला खासगी रुग्णालयातही जास्त दराने उपचार करण्यात येत होते. ते सरकारने नियंत्रणात आणले आहेत.

सात जन्म काय..सात सेंकंद देखील नको बायको आम्हाला |

कोविड-१९ संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर्स, नर्स व फ्रेंड लाइनला काम करणाऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद येथे येणाऱ्या काळात किती जणांना लागण होते, याचा अंदाज घेऊनच व्यवस्था रुग्णालयात करण्यात येत आहेत. यासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्याकडेही आम्ही लक्ष देत असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली..कोरोनाबाधित बाळंतणीचा घाटीत मृत्यू 

खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा घेणार 
पदभरतीविषयी श्री. देशमुख म्हणाले, की पदभरतीची नियमावली तयार आहे. तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या सूचना आहेत. औरंगाबादेत कोविडच्या चाचण्या कमी झाल्या, त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, चाचण्यांसंदर्भात दिल्लीतील संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करण्यात येते. चाचण्यांची संख्या कमी झाल्यास याविषयी संबंधित विभागाशी आम्ही चर्चा करू. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांना केल्याचेही श्री. देशमुख यांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing number of covid test labs in the state will go up to 100