औरंगाबादकरांनो आता अहमदाबादलाही विमानाने जा, तीन फेब्रुवारीपासून होणार इंडिगोची सेवा सुरु 

प्रकाश बनकर
Friday, 22 January 2021

आता अनलॉक सुरू झाल्यावर पुन्हा इंडिगोने देशभरातील सर्व सेवा पूर्ववत करण्यास सुरवात केली आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे दहा महिन्यांपासून ठप्प असलेली इंडिगोची अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदाबाद विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. ३ फेब्रुवारीपासून हे उड्डाण होणार आहे. यामुळे पर्यटन राजधानी गुजरातला जोडली जाणार आहे, अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. 
औरंगाबाद-अहमदाबादसाठी विमानसेवा नियमित सुरू झाली होती. या सेवेमुळे गुजरातसह औरंगाबादच्या उद्योजकांना फायदा झाला होता. मात्र, लॉकडाउनमुळे इंडिगोने ही सेवा काही काळ ठप्प ठेवली होती.

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

आता अनलॉक सुरू झाल्यावर पुन्हा इंडिगोने देशभरातील सर्व सेवा पूर्ववत करण्यास सुरवात केली आहे. औरंगाबादेतून दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. यासह अहमदाबादसाठीची विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ३ फेब्रुवारीपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे.

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

विमान प्रवाशांबरोबर व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याचेही श्री. कोठारी यांनी सांगितले.  इंडिगोचे हे विमान अहमदाबाद येथून रोज सकाळी १०.४५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १२.१५ वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १२.४० वाजता हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता अहमदाबाद येथे पोचेल. 

 

इंडिगोचे औरंगाबाद-अहमदाबाद विमान रोज राहील. ७८ आसनी एटीआर विमानाद्वारे ही सेवा दिली जाईल. यापुढे औरंगाबादला नागपूर, पुणे आणि इंदूरची हवाई कनेक्टिव्हिटी मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल. 
- सुनीत कोठारी, उद्योजक 

 

Edited - Ganesh Pitekar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indigo Starts Aurangabad Ahmedabad Air Service Aurangabad News