esakal | आयटीआय प्रवेश प्रक्रिया ः मराठवाड्यात यंदा १९ हजार २४४ जागा... अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर व उस्मानाबाद या आठ जिल्ह्यातील १३२ आयटीआय संस्थेमध्ये १९ हजार २४४ जागा उपलब्ध आहेत.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया ः मराठवाड्यात यंदा १९ हजार २४४ जागा... अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः कोरोनामुळे यंदा आटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्यात येत आहे. यंदा औरंगाबाद विभागातून १३२ संस्थांमधून १९ हजार २४४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आजपासून (ता. एक) https://admission.dvet.gov या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात नोंदणी करता येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाकडून कळवण्यात आले आहे. 

विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर व उस्मानाबाद या आठ जिल्ह्यातील १३२ आयटीआय संस्थेमध्ये १९ हजार २४४ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ८२ शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार ५५६ जागा; तर ५० खासगी संस्थेत ४ हजार ६८८ जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

ऑनलाईन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार

दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी 
दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बोर्डाने कॉपी प्रकणातील शिक्षेचे स्वरुप बदलले... अशी आहे नवीन नियमावली

प्रवेशाचे वेळापत्रक 
-एक ते १४ ऑगस्ट ः ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती व शुल्क भरणे 
- २ ते १४ ऑगस्ट ः पहिल्या फेरीसाठी संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करण्यासाठी नोंदणी करुन लॉगइन आयडी, पासवर्ड सादर करणे 
- १६ ऑगस्टपासून ः प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध, एसएमएसद्वारे कळवणे 
- १६ व १७ ऑगस्ट ः गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व माहितीत बदल 
- १८ ऑगस्ट (सायंकाळी पाच वाजता ः अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 
- १६ ऑगस्ट ः खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरु होईल 
- एक ते १९ सप्टेंबर ः प्रवेशित जागांसाठी नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदत 
- २१ सप्टेंबर ः सायंकाळी पाचवाजता समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर 
- २१ ते २७ सप्टेंबर ः जिल्हानिहाय समुपदेशन फेऱ्या 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.. विद्यार्थ्यांनो लाभ घ्या...

मराठवाड्याची आकडेवारी 
- शासकीय संस्था ः ८५ (प्रवेश ः १५,१३६) 
- खासगी संस्था ः ५० (प्रवेश ः ४६८८) 

घरात इंटरनेटला स्पीड मिळत नाही का? हा उपाय करा...

                               जिल्हानिहाय आकडेवारी 

जिल्हा एकूण संस्था प्रवेश क्षमता
औरंगाबाद 17 2340
बीड 24 3076
हिंगोली 7 812
जालना 12 1528
लातूर 18 3268
नांदेड 24 4000
परभणी 13 2056
उस्मानाबाद 17 2164
एकूण 132 19,244