लक्ष्मीबाई मतदानाच्या एक दिवस अगोदर आल्या आणि सदस्यहून गेल्या

शिवशंकर काळे
Sunday, 24 January 2021

एखाद्या माणसांचा राजयोग आला. त्या माणसाला पुढे जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही

 

जळकोट (लातूर): एखाद्या माणसांचा राजयोग आला. त्या माणसाला पुढे जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही.अशीच एक गोष्ट बोरगाव ता.जळकोट येथील आपल्या कुंटूबासोबत पुणे येथे उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेल्या महिले बद्दल घडले. निवडणुकीच्या पहिल्या दिवशी आल्या आणि उमेदवार होवून गेल्या.

बोरगाव (ता.जळकोट) ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यातील एक आगळीवेगळी निवडणूक झाली. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिन पॅनल होते. तीनही पॅनल तगडे होते. यात माजी सरपंच गोविद यांचे एक, राष्टवादीचे उदगीर, जळकोट विधानसभा अध्यक्ष शिवाजी केंद्रे, व संजू केंद्रे हे पॅनल प्रमुख होते. निवडणुकीत या तिघांनी प्रचार यंत्रणेत कोणतीही कसरत ठेवली नव्हती. तेवढेच येथील मतदार हुशार मतदारांनी मतमोजणीला जो निकाल दिला तो निकाल पाहून तिनिही पॅनल प्रमुखांना धक्का बसला. या दोघाला दोन ,दोन तर एकाला तिन उमेदवार निवडून दिले. त्यामुळे येथील ग्रामपंचायत ञिशंकू झाली आहे.

Corona Vaccination: लसीकरणात बीड तिसऱ्या स्थानी; हिंगोली, धुळेची सर्वोत्तम कामगिरी

दरम्यान शिवाजी केंद्रे यांनी आपल्या पॅनलमध्ये पुणे येथे आपल्या कुंटूबासह उदरनिर्वाह करण्यासाठी विटभट्टीवर कामाला राहत असलेल्या लक्ष्मीबाई दरबारे या मागासवर्गीय महिलेसाठी वार्ड क्रमांक दोन मध्ये आरक्षण सुटले होते. श्री. केंद्रे यांनी विश्वासाचे कुंटूब असल्याने या कुंटूबातील एक महिला उमेदवार घेण्याचे ठरविले .कुंटुंबानेही मान्यता दिली. अर्ज भरण्यासाठी एक दिवस पुणे येथून कामकाज सोडून लक्ष्र्मीबाईनी अर्ज भरुन गेल्या. त्यानंतर त्या गावात आल्याच नाहीत. 15 तारखेा ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर सौ. लक्ष्मीबाई गावात आल्या. मतदानादिवशी मतदान करून पुन्हा आपली व आल्या कुंटूबाच्या पोटाची खळणी भरण्यासाठी पुणे येथे निघून गेल्या.

'वीस वर्षांपासून रखडलेल्या साठवण तलावाचे काम मार्गी लागणार'

मतमोजणीला सुरुवात झाली तेंव्हा पहिल्या वार्डाचा निकाल हा सुरूवातीला असल्यामुळे थोड्या वेळात निकाल लागला. निकालात पुणे येथे राहत असलेल्या सौ. लक्ष्मीबाई दरबारे विजयी झाल्याचे कळाले. पॅनल प्रमुखांनी खूशखबरी दूरध्वनीवरुन विजयी झालेल्या लक्ष्मीबाईच्या पतिला सांगितली. विजयाची बातमी कानावर पडताच कुंटूबाने महिलेचे गुलाल उधळून अभिनंदन करुन गळा भेट घेतली. मतदाराच्या आले मना तेथे कोणाचे चालेना हे लक्ष्मीबाईच्या बाबतीत घडू आले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalkot political news gram panchayat news Latur latest news