जायकवाडीचे २७ दरवाजे दुसऱ्यांदा उघडले ! ९५ हजार क्युसेकने गोदापात्रात विसर्ग ! 

  चंद्रकांत तारु 
Saturday, 26 September 2020

अतिवृष्टीमुळे जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाचा पाणीसाठा वाढत चालल्यामुळे धरणाचे वक्राकार एकुण २७ दरवाजे  शनिवारी (ता.२६) पुन्हा दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहे. उघडण्यात आलेल्या या दरवाज्यात आपातकालिन नऊ दरवाज्याचा समावेश आहे.

पैठण (औरंगाबाद) : अतिवृष्टीमुळे जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाचा पाणीसाठा वाढत चालल्यामुळे धरणाचे वक्राकार एकुण २७ दरवाजे  शनिवारी (ता.२६) पुन्हा दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहे. उघडण्यात आलेल्या या दरवाज्यात आपात्कालिन नऊ दरवाज्याचा समावेश आहे. त्यामुळे गोदापात्रात ९४ हजार ३२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरण प्रशासनाने सुरु केला आहे. पाणीसाठ्यात अशीच वाढ होत राहिली तर पाण्याचा हा विसर्ग एक लाख क्यूसेक पाण्याचा आकडा पार करेल, अशी शक्यता जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पाच सप्टेंबर पासून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पाणी सुरुच असुन गोदापात्र तुडुंब भरुन वाहत आहे. दरम्यान जायकवाडी धरणाची पाणी पातळी गेल्या २५ दिवसांपासून सतत होणाऱ्या वाढीमुळे हा विसर्ग धरण प्रशासनाला सुरुच ठेवावा लागत आहे. धरण प्रशासन पाण्याची आवक पाहुन कधी दहा तर कधी बारा व तेरा दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात येत आहे. परंतु शनिवारी ता.२६ पाणी येण्याचा वेग झपाट्याने वाढत असल्याची बाब स्पष्ट झाल्यामुळे धरणाचे २७ दरवाजातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (ता.२६) या दुसऱ्या दिवशी पर्यंत धरणाच्या पाणी पातळीत किंचितही बदला झाला नसुन ही पाणी पातळी ९९ टक्के हुन अधिक स्थिर आहे. त्यामुळे गोदापात्रात मोठा पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागला आहे. यासाठी धरण प्रशासनाने रात्र जागून काढून या वाढत्या पाणी पातळीवर लक्ष ठेवले आहे. (ता.२०) सप्टेंबर रोजी धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरण प्रशासनाने २७ दरवाजे उघडुन गोदावरीत पाणी सोडले होते. यानंतर आज पुन्हा सर्व २७ दरवाजे उघडण्याची ही दुसरी वेळ आहे. असे ही धरण सहायक अभियंता श्री. संदीप राठोड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी पाणी परिस्थितीचा आढावा घेतला असुन धरण प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

२३ दिवसापासून अंखड पाणी सोडण्याची पहिलीच वेळ ! 
दरम्यान, मागील वर्षी नाशिक येथील गोदावरीला आलेल्या पुरामुळे हे पाणी जायकवाडी धरणात दाखल झाल्यामुळे धरण भरले. यावेळी धरण पुर्णक्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाच वेळा गोदापात्रात पाणी सोडावे लागले होते. या पाच वेळा पाणी सोडण्याचा रेकॉर्ड धरण इतिहासात निर्माण झाला आहे. आता यंदा ही धरणाच्या इतिहासात २३ दिवसापासून अंखड पाणी सोडण्याचा रेकॉर्ड झाला आहे. त्यामुळे अजुन किती दिवस पाणी सोडावे लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi dam full 27 gate open