अर्धवट रस्त्यांसाठी जूनचा मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

अर्धवट पडून असलेली रस्त्यांची कामे जून महिन्यात सुरू होऊ शकतात, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. तीन कंत्राटदारांनी कामे सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. 

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे शहरातील विकासकामे दोन महिन्यांपासून ठप्प आहेत. शासनाच्या शंभर कोटींच्या निधीतील रस्त्यांना देखील लॉकडाउनचा फटका बसला आहे. एक जूनपासून लॉकडाउन शिथिल होण्याची शक्यता असून, त्या पार्श्‍वभूमीवर अर्धवट पडून असलेली रस्त्यांची कामे जून महिन्यात सुरू होऊ शकतात, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. तीन कंत्राटदारांनी कामे सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. 

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी २०१६ मध्ये महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी दिला होता. त्यातून तीस रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र कंत्राटदारांमधील वादात महापालिकेचे सुमारे दीड वर्ष गेले. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामांचा नारळ फोडण्यात आला. बहुतांश रस्ते व्हाइट टॉपिंग पद्धतीचे होती.

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

मात्र नंतर काही रस्त्यांच्या कामात तांत्रिक अडचणी असल्यामुळे ती डांबरी पद्धतीने करण्याचा निर्णय झाला. त्यात सिटी चौक ते बाराभाई ताजिया, सूतगिरणी चौक ते एकता चौक, चिकलठाणा आठवडे बाजार ते सावंगी बायपास या तीन रस्त्यांचा समावेश आहे. तीसपैकी बावीस रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आठ रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. महापालिकेने कामांसाठी डिसेंबर २०१९ ची मुदत दिली होती. मात्र अतिक्रमणे, पाइपलाइन शिफ्ट करणे, विद्युत पोल काढणे अशा कामांमुळे डेडलाइन हुकली. आता कोरोना व लॉकडाउनमुळे कामे बंद आहेत. 

निकष पाळून सुरू होणार कामे 
रस्त्यांची कामे करण्यासाठी अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी खोदकाम केलेले आहे. काही ठिकणी खडी टाकण्यात आलेली आहे; पण दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील कामे सुरू करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याविषयी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले, की जूनमध्ये रस्त्यांची कामे सुरू होऊ शकतात. तीन कंत्राटदारांनी कामे सुरू करण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली आहे. 

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...
 
सद्यःस्थिती 
शासन निधी-१०० कोटी 
निधी मिळालेले वर्ष-२०१६ 
निधी-८० कोटी 
एकूण रस्ते-३० 
कामे पूर्ण झालेले रस्ते-२२ 
अर्धवट कामे असलेले रस्ते-८ 
कंत्राटदारांसाठी होती मुदत- डिसेंबर २०१९ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: June Moment for Road Work