esakal | वैजापूर, कन्नड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीचे 'मुख्याध्यापक' बनले कारभारी
sakal

बोलून बातमी शोधा

gram-panchayat.jpg

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या वैजापूर आणि कन्नड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. सरपंचांचा कारभार आता मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आल्याने शिक्षक आता गावाचे कारभारी बनले आहेत. 

वैजापूर, कन्नड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीचे 'मुख्याध्यापक' बनले कारभारी

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या वैजापूर आणि कन्नड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी "सकाळ" शी बोलताना दिली. जिल्ह्यातील वैजापूर तसेच कन्नड तालुक्यातील एकूण सत्तेचाळीस ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याचे आदेश शुक्रवारी (ता.२८) काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पस्ट केले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सद्यस्थितीमध्ये घेणे शक्य नसल्याने अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे त्या त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत.त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गोंदावले यांनी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासक पदी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांकडे प्रशासक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला  असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रशासक पदी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे नियमित कामकाज सांभाळून प्रशासक पदाचे काम पाहावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . प्रशासकांना ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही. मात्र सरपंचांना व ग्रामपंचायतींना जे जे अधिकार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत ते सर्व अधिकार प्रशासकांना राहणार आहेत. असेही या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे   

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कन्नड तालुक्यातील या  ग्रामपंचायतींवर  प्रशासकांची  नियुक्ती    
आलापुर, खेडा,देभेगाव  हसन खेडा, जवळी, कळकी, लामणगाव, लंगडा तांडा, मुंडवाडी, मुंडवाडी तांडा, नादरपुर पिंपरखेडा, रेल,रोहिला खुर्द ,रामपुरवाडी, सोनवाडी, सायगव्हाण, सावरगाव ,सासेगाव तळनेर, उपळा,वाकी या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.   

वैजापूर तालुक्यातील या ग्रामपंचायतीवर प्रशासक 
मस्के सिद्धपुर, हाजीपुर वाडी, डोनगाव, बाजाठाण, कापूसवाडगाव, पिंपळगाव, खंडाळा, चेंडूफळ, सावखेड, गंगा भगूर, मालेगाव,सटाणा नायगव्हाण, वळण ,टेंभी, कोडगाव,माळीसागज, तलवाडा, लोणी खुर्द, अघोर, भायगाव, बाभुळतेल, देऊळगाव बाभूळगाव बुद्रुक, आणि भटाणा या गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(संपादक-प्रताप अवचार)