esakal | इम्तियाज जलील यांना खैरेंनीच केले होते निवडणुकीत उभे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा खळबळजनक दावा

बोलून बातमी शोधा

Aurangabad Political News}

आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम येथील राजकीय नेते करतात. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.

aurangabad
इम्तियाज जलील यांना खैरेंनीच केले होते निवडणुकीत उभे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा खळबळजनक दावा
sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील हे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चेले आहेत. त्यांनीच त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभे केले होते, असा खळबळजनक दावा  माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. विकासमहर्षी रायभान जाधव विकास आघाडीच्यावतीने आगामी महापालिका निवडणूक लढविण्याबाबत त्यांनी शहरातील कार्यकर्ते, युवकांची आज बैठक बोलावली होती.

त्यानंतर ते म्हणाले, की इम्तियाज जलील हे माझ्यामुळे निवडून आले, असे सांगितले जाते. परंतु, इम्तियाज यांना माजी खासदार खैरे यांनीच उभे केले होते. येथे औरंगाबाद शहर, जिल्ह्याच्या विकासाचा विचार कमी होतो आणि धार्मिक प्रचाराचा विचार अधिक होतो. त्याचा परिणाम शहर, जिल्हा अधोगतीला गेला आहे.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम येथील राजकीय नेते करतात. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. अनेक नागरिकांची इच्छा आहे, की महापालिकेत उमेदवार द्यावेत. तथापि, कार्यकर्ते ठरवतील त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला जाईल, असेही जाधव यांनी नमूद केले.

खैरे काय देणार उत्तर ?

हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर माजी खासदास तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. जाधव यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत खैरेचां पराभव झाला होता.

संपादन - गणेश पिटेकर