esakal | केळीच्या पानावर पंचामृतासह कोरोना रुग्णांनी घेतला महालक्ष्मीचा प्रसाद 
sakal

बोलून बातमी शोधा

कोव्हीड केअर.jpg

केळीच्या पानावर पंचामृतासह जेवण मिळाल्यानंतर उपस्थित महिलांनी ‘कालपासून घरी असलेल्या गौरी उत्सवाची आठवण येत होती. त्या आज घरच्या सारखेच केळीच्या पानावर पंचामृत चटणीसह पंचपक्वान भोजन मिळाले.

केळीच्या पानावर पंचामृतासह कोरोना रुग्णांनी घेतला महालक्ष्मीचा प्रसाद 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महालक्ष्मी सणानिमित्त प्रत्येक घरात चैतन्यदायी वातावरण असते. महिला नटून-थटून हळदी कुंकवाला जातात. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक महिलांनी यंदाच्या सणापासून दूर कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागले. तसेच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना देखील सणाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे महानगरपालिका आणि इस्कॉन अन्नअमृत फाउंडेशनतर्फे ही उणीव भरून काढण्यासाठी गुरुवारी (ता. २७) दुपारी पंचामृतासह केळीच्या पानावर या सर्वांना जेवण पुरविले व कोविड केअर सेंटरमध्ये पंगती उठल्या. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यावेळी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह कोविड केअर सेंटरच्या डॉ. अंजली पाथरीकर, डॉ. पवार, परिचारिका श्रीमती घोरपडे, सोनवणे, अन्नामृत फाउंडेशनचे सुदर्शन पोटभरे, शुभम भुजबळ, अन्न निरीक्षक रवी घडामोडे यांची उपस्थित होते. यावेळी डॉ. पाडळकर यांनी योग्य आहाराविषयी मार्गदर्शन केले. रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर सुद्धा काळजी घेण्याचा सल्ला दिला. इस्कॉन अन्नाअमृत फाउंडेशनतर्फे पोषक व रुचकर जेवण कोविड सेंटरमध्ये पुरविले जात आहे. त्याचा फायदा विलगीकरणात असलेले नागरिक व त्यांच्या सेवेत असलेला आरोग्य कर्मचारी यांना होत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

घरच्या सारखे मिळाले जेवन 
केळीच्या पानावर पंचामृतासह जेवण मिळाल्यानंतर उपस्थित महिलांनी ‘कालपासून घरी असलेल्या गौरी उत्सवाची आठवण येत होती. त्या आज घरच्या सारखेच केळीच्या पानावर पंचामृत चटणीसह पंचपक्वान भोजन मिळाले. महालक्ष्मीचा प्रसादच मिळाल्याचा आम्हांला आनंद झाला’ अशा प्रतिक्रिया दिल्या. 

Edited By Pratap Awachar