सृजनमयसभा : नाटक सुचण्याची गोष्ट! 

सुधीर सेवेकर
मंगळवार, 7 जानेवारी 2020

 कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धा 

औरंगाबाद : नाटककाराला नाटक कसे सुचते? याचे कुतुहल रसिकांना नेहमीच असते. मराठवाड्यातील सिद्धहस्त नाटककार रविशंकर झिंगरे यांनी याच प्रश्‍नाला होऊन "सृजनमयसभा' हे नाटक फुलवले आहे. 

नाट्यरसिकांची गर्दी 

राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक यंदा नांदेड केंद्रावर सर्वप्रथमही झालेले आहे. त्यामुळेच प्रस्तूत नाटकाच्या कामगार कल्याण स्पर्धेतील या प्रयोगाला सुजाण नाट्यरसिकांची बऱ्यापैकी गर्दी होती. त्यात नांदेड परभणीचे पण सध्या औरंगाबादेत स्थायिक असलेल्या रसिकांची संख्या मोठी होती. आपल्याला अलिबाबा आणि चाळीसचोरांची गोष्ट पिढ्यान्‌पिढ्यांपासून माहिती आहे. त्याच पारंपरिक कथेकडे लेखक एकावेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागतो आणि त्यातून त्याच्या मनात ज्ञान असलेल्या या गोष्टीचे अनेक अज्ञात पैलू त्या कथानकाचा संभाव्य पुढील भाग प्रतिभाशक्तीच्या सामर्थ्यातून हळूहळू आकाराला येऊ लागतो की त्यातून उभी राहाते एक तिलिस्मी सृजनमयसभा होय. 

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

वास्तव आणि अभास 

लेखक त्याचे वास्तवजीवन, त्यातील त्याची नाटक वगैरेत अजिबात रुचि नसणारी, पण चारचौघींसारखी सामान्य बायको आणि दुसरीकडे त्याचे अलिबाबाच्या कथानकातील विश्‍व, त्यातील अलिबाबावर प्रेम करणारी त्याची धाडसी, चतूर दासीचे मार्जिनाचे भुरळ पाडणारे व्यक्तिमत्व, अशा दोन्ही पातळ्यांवर वावरत असतो. त्यातील हेलकावे, झोके, अनुभवत असतो आणि ते सगळे हेलकावे, झोके तो प्रेक्षकांनाही देत राहातो. वास्तव आणि आभास जुगलबंदीची ही कहाणी म्हणूनच अधिकाधिक रोचक बनत जाते आणि प्रेक्षकांना काहीतरी वेगळे, अफलातून पाहात असल्याचा अनुभव मिळतो. 

हेही वाचा - शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा

रसिकांना जिंकले प्रयोगाने 

प्रयोग तंत्रदृष्ट्या, अभिनयदृष्ट्या छान होतो. लेखक-दिग्दर्शकाने या नाट्यबांधणीत अलिबाबाची दुसरी गोष्ट एवढा जरी आशय मध्यवर्ती ठेवला असता तरी नाटक एक छान फॅन्टसी म्हणून उभी राहीले असते. त्यात बायको-तिचे सामान्यपण वगैरे आणले नसले तरी चालले असते असे माझे मत आहे. असे सृजनमयसभाने यंदाच्या स्पर्धेत रसिकांना जिंकून घेतले हे नक्की. 

 

सृजनमयसभा. लेखक-दिग्दर्शक रविशंकर झिंगरे नेपथ्य : स्नेहल पुराणिक, प्रकाश : सुधीर देऊळगावकर, संगीत : समीरण झिंजरे, रंगभुषा : अंगिरा चिक्षे, वेशभुषा : अनुष्का चिक्षे, रंगमंचव्यवस्था : सुतारमामू, कलावंत : किशोर पुराणिक. त्र्यंबक वडसकर, राधिका पिंगळकर. आणि डॉ. अर्चना चिक्षे. सादरकर्ते : कामगार कल्याण केंद्र, सिडको, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor welfare drama competition Aurangabad