लाईट कधी येणार गं आई, क्लास सुरू होतोय! लासूर बाजारपेठही ठप्प, वीज कायम गुलच.  

Load_Shedding_h.jpg
Load_Shedding_h.jpg

लासूर स्टेशन (औरंगाबाद) : आई ग क्लास सुरू होतोय, लाईट कधी येणार! मला अभ्यास करायचा आहे.!, ग्रुपवर सगळे चर्चा करतात मी मिस्स करतेय अशा तक्रारींनी एकसुरात किलकील करणाऱ्या बालगोपालांना काय उत्तर द्यावे असे पालकांना समजेनासे झाले होते. कारण काय तर तब्बल वीस तास गुल झालेली वीज. हा दोन दिवसादरम्यानचा रेकॉर्ड ब्रेक टाइम नंतरही सातत्याने वीज जाते आणि कधीही येते. त्यामुळे आबालवृद्घांपासून, आरोग्य, औद्योगिक, शैक्षणिक वर्गातील लोक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या वीज लंपडावाच्या खेळाने सर्वसामान्यांचे जगणे अवघड होऊल बसले आहे. तर महावितरण देखील नागरिकांच्या समस्येकडे कानाडोळा करीत आहे. 

जग आधुनिक झालंय आणि महावितरणची अवस्था बिकट होत चालली. जरासं खुट्ट झालं की वीज होते गायब. आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आताशी कुठं अनलॉक होत आहे. आता यात शाळांची कुलपे काही उघडली नाही. त्यामुळे घरीच अभ्यास आणि ऑनलाइन क्लास, ग्रुपवर चॅट, ऑनलाइन मिटींग अशी पालकांपर्यंत यायला लागली. हे सगळं एका मोबाइल वर घडले आहे. या मोबाईलला विजेअभावी चार्ज करता येईना कारण वीस तास वीज गुल. आणि या अभ्यासू बालकांची मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर विजेची गरज भासली आणि एकच किलबिल सुरू झाली. कारण प्रत्येकाकडे इन्व्हर्टर नाही. मग एकच गलका लाईट कधी येणार, 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
लासूर स्टेशन (ता.गंगापूर) परिसरातील ही परिस्थिती आहे. मंगळवारी (ता.20) दुपारी चारच्या सुमारास गेलीली लाईट आली थेट बुधवारी (ता.21) दुपारी साडेबाराच्या सुमारास आणि तीही डळमळीत. गुरुवारी (ता.22) पण पहाटे सहाला गेलेली वीज तब्बल सात तासांनी दुपारी एकच्या नंतर आली. दुपारी ऐक वाजेनंतर आलेली वीज संध्याकाळपर्यंत लपंडाव करत होती. वीज आली तरी कमीजास्त दाब होत असून काही नागरिक या कमीअधिक दाबामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणात बिघाड झाली आहे. अशी तक्रार करीत आहेत. 

अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे हतबल झालेल्या नागरिकांना आता महावितरणच्या या प्रकारामुळे मनस्ताप करावा लागत आहे. त्यात ऑनलाईन प्रयत्न सुरू असताना आता हे ऑनलाइन जगणं आलं. आणि या जगण्याचा प्राणवायू आहे वीज. तब्बल वीस तास वीज गुल झाल्याने बालगोपालांसह आबालवृद्धांच्या तक्रारीचा महापूरच आला. सगळं जगणं ऑनलाइन झालंय तेव्हा तक्रारही त्याच विषयाची येणार अस म्हणत पालक हा घटक महावितरणच्या या खंडित वीजपुरवठ्यावर नाराज होत असून बाजारात इन्व्हर्टर, पॉवर बँक, सोलर लाईट, बॅटरीत वीज साठवण, मोठ्या बॅटरीची क्षमता असलेले मोबाईल, बॅटरीवर चालणारी टॉर्च, ट्यूब, अशी विविध उपकरणे शोधत बाजारपेठा धुंडाळतो.

बाजारपेठा ठप्प
मोठी बाजारपेठ व अनेक वीजेवर अवलंबून असणारी लहान औद्योगिक इंडस्ट्रीतील दालमिल, तेल, शुद्ध पाणी जार प्लांट, अल्युमिनियम फॅक्टरी, कॉटन मिल पासून तर झेरॉक्स, गॅरेज, पिठाची गिरणी पर्यंत उपकरणे व व्यवसाय सगळं कसं ठप्प होत. या सर्व ठप्प होण्यामागे लाखोंचे नुकसान तर होतेच पण ठप्प इंडस्ट्रीवर अवलंबून असणारा कामगार पण ठप्प होतो. परिणामी या नुकसानीला कारणीभूत आहे वीज. याचे गांभीर्य कदाचित महावितरणला नसेल पण नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. 

महावितरणने देखील चेहरा बदलावा 
सगळीकडे आधुनिक साधन तेव्हा महावितरणने पण गतकाळातील चेहरा आता उजाळावा अशी मागणी होऊ लागली आहे. गंजलेली, कालबाह्य, मुदतबाह्य, क्षमता नसतांना अधिकचा लोड टाकलेली रोहित्र, वीज खांब आणि वीज तारा कधी व कितीकाळ वैधता असणारी आहेत. हे महावितरणला माहीत पण लाईट गुल होण्याने लाखोंचं नुकसान होते. त्यामुळे महावितरणे पुन्हा कात टाकावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

शेतकरी त्रस्त
अगोदरच पाऊस मारतोय आता विजेनेही लपंडाव सुरू केल्याने ग्रामीण भागात गैरसोयीचे ठरतेय. शेतात गुडघाभर पाणी साचलं. कापसाच्या वाती झाल्या तरीही उभा राहण्यासाठी धडपड करणारा शेतकरी रात्री अंधारात साप, विंचूकाट्याच संकट झेलत कसाबसा जगतोय तर ही वीज त्यात अजून भर टाकते. लासूर स्टेशनच्या महावितरण प्रशासनाने गेल्या काही महिन्यातील वीज खंडित होण्याची कारण तपासली तर सगळं समजेल. पण तसदी घेणार कोण अशी काहीशी अवस्था आहे. आणि यात होरपळून निघतोय सर्वसामान्य माणूस. 

काय म्हणतात लोक...! 

 

महावितरणने अखंडित वीजपुरवठा करावा या मागणीसाठी आंदोलने, मोर्चे निघत आहेत, तरीही स्थितीत बदल होत नाही. त्यामुळे कुठे ही तक्रार ऐकली जाणार आणि निकाली निघणार येणारा काळच सांगेल. पण प्रयत्न प्रामाणिकपणे केले जावेत अशीच अपेक्षा महावितरणचा ग्राहकवर्ग करत आहे.
प्रीतमकुमार मुथा (संचालक, वैजापूर मर्चंट बँक) 

गावात मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी, शुक्रवारीही लपंडाव करत खंडीत व कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने बँकिंगला तर त्रास झालाच पण औद्योगिक व व्यावसायिक नुकसान काही लाखात असू शकते. - गणेश व्यवहारे (माजी उपसरपंच)

लासूर स्टेशन सारख्या मोठ्या बाजारपेठेत वीजेचा लंपडाव नुकसानीचा आहे. हे उद्योजक, व्यापारी, शेतकरीच समजू शकतात. महावितरणला याची जाणीव नाही. नाहीतर या गावाच्या वीजेचा असा खेळखंडोबा झाला नसता. 
संजोग पाटणी (भाजप पदाधिकारी, व्यापारी) 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com