
औरंगाबाद- कोरोनाचा कहर सध्यातरी कमी होताना दिसत नाही; पण सरकारच काय तर सर्वच म्हणतात, आता कोरोनासोबत जगावे लागेल. मग कोरोनासोबत जगायचे म्हणचे नेमके कसे जगायचे, हा प्रश्न सहजच मनाला स्पर्शून जातोच. आपल्या मूलभूत बाबींत आता मास्क आणि स्वच्छतेसह आरोग्याला अत्युच्च महत्त्व आहे. कोरोनासोबत जगायचे म्हणचे खूप काळजी घ्यायची, बदलांचा स्वीकार करायचा आणि दैनंदिन व्यवहारही सुरक्षित ठेवायचा. संसर्गाचा काळ संपेपर्यंत, रामबाण लस येईपर्यंत असेच जगावे लागेल.
कोरोनासोबत जगताना...
घरातून बाहेर पडताना सॅनिटायझरची बाटली, छोटा स्प्रे सोबत ठेवा. मास्क वापरा. गर्दी असेल तेव्हा अथवा नसेल तेव्हा मास्क कसा वापरायचा, त्याचे नियम पाळा. कामासाठी जरी बाहेर पडत असाल तरीही व्यक्ती-व्यक्तीत सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. कार्यालय असो की कोणतेही कामाचे ठिकाण, ती जागा सॅनिटाईज करण्याची सवय लावा. अगदी कार्यालयात पाणी प्यायचे असल्यास कुणी आसपास नसेल तेव्हाच पाणी पिणे योग्य. कार्यालयाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जेवण न केल्यास चांगले. शक्यतो घरीच भोजन करा, हॉटेलमध्ये तूर्तात तरी न गेलेले चांगले. घराशिवाय भोजन करीत असाल तर अशी जागा निवडा जिथे आपण एकटे असाल. कुटुंबाशिवाय सहभोजनाला फाटा द्या. एकत्र खाणे, एकाच ताटात खाणे टाळा.
नातेसंबंध जपा; पण सुरक्षा बाळगून
घरात कुणी पाहुणे आले तरी त्यांना कोरोना संसर्गाच्या धोक्याची जाणीव करून द्या. नातेसंबंध महत्त्वाचेच परंतु आपली व नातेवाइकांचीही सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचीही स्वतंत्र व्यवस्था करा. त्यांनाही सॅनिटाईज करायला सांगा. जर तुम्ही पाहुण्यांकडे गेलात तर तुम्हीही त्यांना अडचण होणार नाही, ते संकटात येणार नाहीत असे वर्तन ठेवा. अगदी लग्नसमारंभही छोटेखानी, साधे असावेत. अंत्यसंस्कारासाठीही घालून दिलेले नियम पाळा.
व्यवहाराच्या गोष्टी
हे वाचा आणि अमलात आणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.