औरंगाबादेत भाजप कार्यकारिणी निवडीवरून गटबाजी, शहराध्यक्ष नाराज, खासदारांनी जाहीर केली यादी

प्रकाश बनकर
Monday, 31 August 2020

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवरून पुन्हा एकदा पक्षातील गटबाजी समोर आली आहे. विद्यमान शहाध्यक्षांनी सुचवलेल्यांचा शहर कार्यकारिणीत समावेश न झाल्याने शहराध्यक्ष संजय केणेकर नाराज झाले. शहर कार्यकारिणीची घोषणा खासदार डॉ. भागवत कराड यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत मर्जीतील लोकांना संधी मिळवून दिल्याचा आरोप काही नाराज पदाधिकऱ्यांतर्फे केला जात आहे.

औरंगाबाद: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवरून पुन्हा एकदा पक्षातील गटबाजी समोर आली आहे. विद्यमान शहाध्यक्षांनी सुचवलेल्यांचा शहर कार्यकारिणीत समावेश न झाल्याने शहराध्यक्ष संजय केणेकर नाराज झाले. शहर कार्यकारिणीची घोषणा खासदार डॉ. भागवत कराड यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत मर्जीतील लोकांना संधी मिळवून दिल्याचा आरोप काही नाराज पदाधिकऱ्यांतर्फे केला जात आहे.

हेही वाचा- सामंत यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही, वाचा कोणी दिला इशारा

नवीन वर्षाच्या सुरवातीस भाजप शहाराध्यक्षपदी संजय केणेकर, तर जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची निवड करण्यात झाली. उर्वरित कार्यकारिणीची निवड कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, विविध सदस्यांच्या निवड करताना मर्जीतील लोकांना संधी देण्यात आली. यात काही निष्ठेने काम करणाऱ्यांचे डिमोशन करण्यात आले.

शहर कार्यकारिणीत औरंगाबाद पूर्वीचे वर्चस्व दिसून आले. यात काम करणाऱ्यांना दुय्यम पदे देण्यात आल्याच प्रकारही समोर आला आहे. तर ग्रामीणची कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करण्यात आल्याने अनेकांना त्यांच्या कामामुळे मिळणारे पदे दुसऱ्यांना देत डावलण्यात आल्याचा आरोपही काहींनी केला आहे. यामुळे काहींनी उघड नाराजी व्यक्त केली, तर शहराध्यक्षांनी सुचवलल्या नावांना कार्यकारणीत दुय्यम पदे दिल्यामुळे शहराध्यक्ष नाराज झाले.

क्लिक करा- औरंगाबादेत चाचण्यांचा विक्रम; क्वारंटाइनचा नीच्चांक

जिल्ह्याची कार्यकारिणासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुरवातीला शहर कार्यकारिणी जाहीर करण्यास नकार देणाऱ्या खासदार कराड यांनीच शहराची यादी जाहीर केली. ग्रामीण कार्यकारिणी स्वत: जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी जाहीर केली. औताडे यांच्यासह जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. निष्‍ठावंतांना दुय्यम मिळालेल्या पदामुळे नाराज झालेलांचा महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. याविषयी शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

हे वाचलंत का?- काय सांगता ! ६२ लाख मिळाले हो, पण तरीही इथंच घोड पेंड खातय

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lobbying Over New Office Bearers Election In BJP Aurangabad News