esakal | अतिवृष्टीने पाच लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान, मराठवाड्यातील भयावह चित्र ! 
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान.jpg

बहुतांशवेळा मराठवाड्यात मान्सूनचे उशीरा आगमन होते आणि त्यातही समाधानकारक पाऊस बरसत नाही असा नेहमीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी मान्सून मराठवाड्यात चांगलाच बरसला. अपेक्षेपेक्षा जास्त चांगला पाऊस आला खरा मात्र या अतिवृष्टीमुळे आणि त्यातुन उदभवणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे तब्बल ८ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची मोठी हानी झाली आहे.

अतिवृष्टीने पाच लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान, मराठवाड्यातील भयावह चित्र ! 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : सतत मराठवाड्यावर नाराज असणारा मान्सून यंदा चांगला राहिला. परंतू हा पाऊस यावर्षी एवढा जास्त बरसला की मराठवाड्यातील तब्बल ५ लाख १३ हजार ४४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रातील खरिप पिकांचे प्रमाण जास्त आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

बहुतांशवेळा मराठवाड्यात मान्सूनचे उशीरा आगमन होते आणि त्यातही समाधानकारक पाऊस बरसत नाही असा नेहमीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी मान्सून मराठवाड्यात चांगलाच बरसला. अपेक्षेपेक्षा जास्त चांगला पाऊस आला खरा मात्र या अतिवृष्टीमुळे आणि त्यातुन उदभवणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे तब्बल ८ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची मोठी हानी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

औरंगाबाद व लातूर कृषि विभागांतुन मिळालेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ९७ हजार ५०७ शेतकऱ्यांचे, जालना ३ लाख ८९ हजार ८२९, बीड ११ हजार २३७ , नांदेड ३ हजार २८, हिंगोली ११ हजार ८१६ तर परभणी जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रात जिरायती क्षेत्रातील ३,०२०१४ हेक्टर, बागायती क्षेत्रातील १३५७६ तर फळपिकांच्या १२५८६ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे जूनपासून झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)