esakal | शिवजयंती : मनसेचे शिवप्रेम, की तात्पुरती खेळी? 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

सातत्याने अपयश येत असल्याने राजकीय भूमिका बदललेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसापूर्वीच हिंदूत्वाचा नारा देत भगवा झेंडा हाती घेतला. तारखेनुसार साजरी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीउत्सवात उडी मारत पहिल्यादांच जल्लोषही केला.

शिवजयंती : मनसेचे शिवप्रेम, की तात्पुरती खेळी? 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : सातत्याने अपयश येत असल्याने राजकीय भूमिका बदललेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसापूर्वीच हिंदूत्वाचा नारा देत भगवा झेंडा हाती घेतला. तारखेनुसार साजरी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीउत्सवात उडी मारत पहिल्यादांच भगवे वादळं अशा घोषणा देत क्रांती चौक येथे जल्लोषही केला. हे मनसेचे शिवप्रेम की आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर केलेली खेळी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (ता.१९) प्रथमच तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. यामुळे शिवरायांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी केली पाहिजे, हा हट्ट मनसेने सोडला की, ही तात्पुरती राजकीय खेळी आहे? असा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी शिवसेना, मनसे तारखेनुसार शिवजयंती साजरी करत नव्हती. परंतू, मागील दोन वर्षापासून मराठा क्रांती मोर्चाने वातावरण ढवळून निघाले आहे. याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

यंदा तर अपार असा उत्साह पाहायला मिळतोय. राज्यात राजकीय समीकरण बदलल्यानंतर आपले अस्तीत्व शोधू पाहणाऱ्या मनसेनेदेखील आपली भूमीका बदलली. बुधवारी तर चक्क शिवजयंती सोहळा देखील साजरा केला. येथील क्रांतीचौकात मोठे स्टेज उभारून असे हे भगवे वादळ असे गाणे लावत शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी नृत्य केले. 

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा आणि हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेला भगवा झेंडा हाती घेत तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करणाऱ्यांमध्ये मनसे दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्याच्या आसपास महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांवर डोळा ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच मनसे तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करीत आहे का?असा प्रश्‍न उपस्थीत केला जात आहे. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह