८ ऑक्टोंबरला औरंगाबादेत 'महा ऐक्य परिषद' 

प्रकाश बनकर
Friday, 2 October 2020

  • राज्यभरातील समन्वयक होणार सहभागी. 
  • औरंगाबाद मराठवाडा क्रांती मोर्चा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती. 

औरंगाबाद : मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीच्या आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याच संदर्भात केंद्र व राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. वेगवेगळे आंदोलनही करण्यात येत आहे. याच विषयची पुढील भुमिका ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबादेत ८ ऑक्टोंबरला 'महाऐक्य परिषद' घेण्‍यात येणार आहे. यात राज्यातील सर्व समन्वयक सहभागी होणार आहे, अशी माहिती मोर्चाचे समन्वयकांनी शुक्रवारी (ता.२) पत्रकार परिषदेत दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याचा फयदा काही राजकीय लोक उचलत आहे. याच अनुषंगाने राज्यातील काही ठिकाणी झालेल्या बैठकीत राजकरण होऊ लागले आहे. असा आरोप औरंगाबादेतील समन्वयकांनी केला. यामुळे या परिषदेत राजकारण विरहित पक्षाचे जोडे बाहेर काढून सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना निमंत्रण दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या ऐक्य परिषदेतून १० ऑक्टोंबरला होणाऱ्या बंद विषयी भुमिका स्पष्ट केली जाणार आहे.

कोपर्डी प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादेतून शांतता, संयमाने राजकारण विरहित मोर्चा काढण्यात आला. ५८ मोर्चाचे नेतृत्वही औरंगाबादच्या नियमावली नुसारच झाले आहेत. आता वेगवेगळ्या बैठका होत आहे. नेतृत्व कोणी करावे यावर चर्चा होत आहे. नेतृत्व कोणीही करावे. मात्र त्यांनी मराठवाड्याचा विचार व त्यांचा संयमाचा विचार करावा, या विषयी कुठलाच विचार होताना दिसत नसल्याचेही समन्वयकांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यातील समाजाला आरक्षणाची गरज आहे. हैदराबाद स्टेट मध्ये मराठवाडा असताना ओबीसीमध्ये मराठा समाज होता. मात्र महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर राजकारण्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून काढून टाकले असल्याचाही आरोप करण्यात आला. यामुळे केंद्र व राज्य सरकाने आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठवावी. मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान दाखल झालेले गुन्हे दाखल मागे घ्यावेत. आरक्षणाला बलिदान दिलेल्या सरकारी नोकरी व दहा लाखाची मदत द्यावीत यासह विविध मागण्या असून त्यावर सरकारने सकारात्मक विचार करावात असेही समन्वयकांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या पत्रकार परिषदेला  समन्वयक चंद्रकांत भराड, सुरेश वाकडे पाटील, प्रा. शिवानंद भानुसे, सतीश वेताळ, अभिजित देशमुख, रमेश गायकवाड, शिवाजी जगताप, रेखा वाहटूळे, सुकन्या भोसले, अजय गंडे, योगेश औताडे, बाबासाहेब औताडे, नितिन देशमुख, संतोष तांबे, प्रदीप हरदे, राजेंद्र वाहटुळे, विलास डंबाळे, अनिल बोरसे,विशाल तांबे, प्रसाद उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Aurangabad Meeting News