esakal | BharatBandh : औरंगाबाद शहरातील अर्धेअधिक व्यापारी आस्थापना राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

SakalNews

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.8) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील अर्ध्याहून अधिक व्यापारी आस्थापना बंद राहणार आहेत.

BharatBandh : औरंगाबाद शहरातील अर्धेअधिक व्यापारी आस्थापना राहणार बंद

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.8) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील अर्ध्याहून अधिक व्यापारी आस्थापना बंद राहणार आहेत. बाजार समिती पूर्णपणे बंद ठेवत पाठिंबा देण्याची तयारी व्यापाऱ्यांनी केली आहे. उद्योगनगरी सुरु राहणार असून काहीजण स्वेच्छेने बंद पाळणार आहेत. या बंदचा कमी जास्त प्रमाणात व्यवहारावर परिणाम जाणवणार आहे.


भारत बंदला बहुतांश राजकीय पक्ष, सामजिक संस्था, व्यापारी, यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला आहे. या बंदसाठी व्यापारी, उद्योजकांची बैठक घेण्यात आली. यात शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. मात्र कोरोनामुळे सहाहून अधिक महिने बंद असल्यामुळे व्यापारी आस्थापने सुरु ठेवणार आहेत. तर काही स्वत:हून बंद ठेवणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. जाधववाडी मात्र बंद राहिल, अशी माहिती अडत मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैय्यालाल जयस्वाल यांनी सांगितले. तसेच सराफा, कापड, किराणा, जूना मोंढा मार्केट मधील काही अस्थापना सुरू राहतील.
राज्यातील सर्व खते-बियाणे दुकाने बंद राहणार आहेत.

BharatBand: उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने राहणार बंद, व्यापारी महासंघाचे भारत बंदला पाठिंबा

‘माफदा’ची राज्यस्तरीय बैठक घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व खते-बियाणाचे दुकाने कडकडीत बंद राहणार आहेत, अशी माहिती माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. बँकेचे कर्मचारी कर्तव्य बजावत या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्पालॉइज फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापुरकर यांनी सांगितले.भारत बंद विषयी उद्योजकांची बैठक झाली. यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नास काहिनी पाठिंबा दर्शविला आहेत. मात्र उद्योग सुरु ठेवणार आहेत. बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ज्या त्या उद्योजकांनी घ्यावा असे सांगण्यात आले. यात लघु उद्योग भारती सहभाग घेणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी सांगितले.