मराठा क्रांती ठोक मोर्चाचा ईडब्ल्युएसला विरोध, एक जानेवारीला जनजागृती महामेळावा

प्रकाश बनकर
Sunday, 27 December 2020

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द करुन एसईबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी ५८ मोर्चे काढले. अनेकांनी ४२ तरुणांनी बलिदान दिले.

औरंगाबाद : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द करुन एसईबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी ५८ मोर्चे काढले. अनेकांनी ४२ तरुणांनी बलिदान दिले. असे असताना समाजाच्या आरक्षणास स्थगिती मिळाली आहे. ती स्थगिती उठविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. आता ईडब्ल्यूएस चांगले असल्याचा दावा करण्यात येत आहे. या ईडब्ल्युएसला मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे विरोध करण्यात येत आहे.

 

 

यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी एक जानेवारीला औरंगाबादेत राज्यव्यापी मराठा आरक्षण जनजागृती महामेळावा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. केरे म्हणाले, की ईडब्ल्यूएस मराठा समाजाला कधीच मान्य राहणार नाही. एसईबीसी आरक्षण टिकवावे अन्यथा, ओबीसीतून आरक्षण मिळावेत, अशी भूमिका घेण्यात आली होती. न्यायालयान एसईबीसी मराठा आरक्षणाचा कायद्यावर शिक्कामोर्तब केले होते. तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी प्रवर्गातील जातीचा सर्व्हे करुन निर्णय घेण्यात यावा असा आदेश असताना राज्य सरकारने काहीच कारवाई केली नाही, असे विविध मुद्दे मांडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Thok Morcha Oppose EWS Aurangabad News