esakal | मराठा समन्वय समिती; क्रांतीदिनी आंदोलनाचा दिला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

maratha.jpg

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मराठा समन्वय समिती; क्रांतीदिनी आंदोलनाचा दिला इशारा

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : मुख्यमंत्री आणि उपसमितीतील मंत्र्यांना निवेदन देऊनही गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे नाशिक येथे विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यानुसार राज्यभर जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

मुख्यमंत्र्यांनी समाजातील प्रमुख नेत्यांची, अभ्यासकांची तसेच संघटनांच्या प्रतिनिधींची जोपर्यंत बैठक बोलवत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येतील. यावर दोन दिवसात निर्णय घ्यावा. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होणाऱ्या बैठकीत शब्द दिल्याप्रमाणे काही घडत नाही. असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

मराठा समन्वय समितीने १६ प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. यात अशोक चव्हाण यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना उपसमितीचे अध्यक्ष करावे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी न्यायप्रक्रियेला गती द्यावी. आरक्षण आंदोलनासाठी बलीदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये आणि घरातील सदस्यास नोकरी द्यावी. सारथीला जास्तीचा निधी द्यावा. कै आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज पुर्ववत करावे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

 अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील स्थगिती उठवुन बांधकामास गती द्यावी. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेबाबत अंमलबजावणी करावी. एसईबीसीतुन नोकरी मिळालेल्यांना सामावुन घ्यावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठीच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला घेता येणार नाही, तो निर्णय रद्द करावा. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची भुमिका कळण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश 

न्यायालयीन सुनावणी समोरासमोर व्हावी. मराठा आरक्षण घटनापीठाकडे चालवावे. इतर राज्यातील आरक्षणाच्या केसमध्ये मराठा आरक्षणाच्या केसचा समावेश करावा. उच्च न्यायालयातील वकिलांना यात सहभागी करुन घ्यावे. मराठा आरक्षणाबाबचा विषय विजय वडेट्टीवार यांच्याकडे देऊ नयेत. मराठा समाजाच्या प्रश्‍नांबाबत जाणकारांच्या सूचना घ्याव्यात.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

निवेदनावर सुनिल कोटकर, ज्ञानेश्‍वर गायकवाड, रविंद्र काळे, किशोर चव्हाण, मच्छिंद्र उबाळे, शैलेश भिसे, बाळकृष्ण लेवडे, ज्ञानेश्‍वर लेवडे, ॲड. अविनाश औटे, गंगाधर औताडे, माधव पवार, संतोष गायकवाड, महेश जोगदंड, निलेश धस, बाळासाहेब भगनुरे, विजय घोगरे, गणेश थोरात, आण्णा काटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.