मॅरेथॉनचे उद्‌घाटक रविंद्र सिंगलही धावले स्पर्धेत

Aurangabad News Marathon Inaugural Ravindra Single Also Ran In The Competition
Aurangabad News Marathon Inaugural Ravindra Single Also Ran In The Competition
Updated on

औरंगाबाद : कडाक्‍यात थंडी त्यात पुन्हा हलकासा वारा अंगात हुडहुडी भरत असतानाच मोठ्या जोशात गेट गोईंगच्या मॅरेथॉनला सुरवात झाली. दोन वर्षांच्या मुलींसह सत्तरीपार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. तीन, पाच, दहा किलोमीटरच्या स्पर्धेला मॅरेथॉनचे रुप दिले होते. शहरवासियांनीही यात उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

फेब्रुवारी महिन्यातील पहिला रविवार आणि गेट गोईंगची रन फॉर हर मॅरेथॉन हे समीकरण ठरलेलेच. नवव्या स्पर्धेतही तोच उत्साह पहायला मिळाला. महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण आणि सन्मान हा उद्देश घेऊन रन फॉर हर ची सुरवात झाली. यंदाच्या वर्षी अठराशेहून अधिक स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. 12 ते 40 आणि पंचेचाळीसच्या वरील महिला आणि पुरुष गटात स्पर्धा झाली.

प्रोझोन मॉल येथून सकाळी सहा वाजता 10 किलोमीटरच्या स्पर्धेला विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंगल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरवात झाली. त्यानंतर, पोलीस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांच्याहस्ते पाच आणि तीन किलोमीटरच्या स्पर्धेला सुरवात झाली. प्रोझोन ते आकाशवाणी चौकादरम्यान, ही स्पर्धा झाली. या मार्गावरच तिन्ही स्पर्धा झाल्या.

स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मार्गावर संगीत, ढोल पथक, बॅंडचे होते. पाणी, एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधा होती. विजेत्यांसह स्पर्धा पुर्ण करणाऱ्यांनाही पदकांचे वाटप करण्यात आले. पारितोषिक आणि पदक विजेते उत्साहात सेल्फी पॉईंटवर जाऊन छायाचित्र काढून घेत होते. विशेष म्हणजे रविंद्र सिंगल यांनीही दहा किलोमीटरचे अंतर पुर्ण केले. अंध असूनही कळसुबाई शिखर सर करणारा रितेश खैरे आणि अमरजितसिंग चावला या दोघांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेतील विजेते :
पाच किलोमीटर 12 ते 40 (महिला) - गायत्री गायकवाड, अश्विनी तुरुकझाडे, अश्विनी जाधव. 40 वर्षापुढील (महिला) - डॉ. निता मनियार, ज्योती संगेवार, सोनम संतोष.
दहा किलोमिटर 12 ते 40 (महिला) - माधुरी चेचर, प्रियंका औटे, प्रिया देमारे. 40 वर्षापुढील (महिला) सुनिता सोपोळकर, किर्ती काबरा, आरती सोनी.
पाच किलोमीटर 12 ते 40 (पुरुष) - विनय दुबाळे, शेखु वाघ, रामभाऊ पाल. 40 वर्षापुढील (पुरुष) - राम लिंबोरे, सतीश यादव, लालाचंद सुर्यवंशी.
दहा किलोमीटर 12 ते 40 (पुरुष) - नितीन तळीकोटे, शाम राठोड, नितीन चोबे. 40 वर्षापुढील (पुरुष) - विश्‍वास चौगुले, कैलास सनासे, बालासाहेब जाधव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com