या दोन गोष्टीत मराठवाडा आजही मागे - अर्थतज्ज्ञ डॉ माधव दातार

Marathwada Backwards in Human Development Index and Higher Education
Marathwada Backwards in Human Development Index and Higher Education

औरंगाबाद : अनुशेषासंदर्भात दांडेकर आणि केळकर यांची समिती स्थापन झाली. तरीही महाराष्ट्रातील अन्य विभागाच्या तुलनेत मराठवाड्याचा मनुष्यबळ विकास निर्देशांक आणि उच्च शिक्षणाचा दर आजही कमीच आहे. या बाबींचा विचार करुन धोरण ठरवावे लागेल, असे मत आयडीबीआयचे माजी महाव्यवस्थापक अर्थतज्ज्ञ डॉ. माधव दातार यांनी मांडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पॉलिसी इनीशिएटिव्हज ऍण्ड दिअर इम्पॅक्‍ट ऑन डेव्हलपमेंट ऑफ मराठवाडा विषयावर 17 आणि 18 जानेवारीला राष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. चर्चासत्राचे उद्‌घाटन डॉ. दातार यांच्याहस्ते शुक्रवारी (ता. 17) झाले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. सामाजिकशास्त्राचे अधिष्ठाता डॉ. सतीश दांडगे, मुख्य समन्वयक डॉ. धनश्री महाजन यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - 

डॉ. दातार म्हणाले, अनुशेषासंदर्भात 1984 मध्ये पहिल्यांदा दांडेकर समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी आर्थिक तरतूद व विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. तसेच 2013 मध्ये केळकर समितीची स्थापनाही करण्यात आली. तरीही महाराष्ट्रातील अन्य विभागाच्या तुलनेत मराठवाड्याचा मनुष्यबळ विकास निर्देशांक व उच्च शिक्षणाचा दर आजही कमीच आहे. या सर्व बाबींचा विचार करुन धोरण ठरवावे लागेल.

हेही वाचा - 

अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात आजही गरिबी आहेच मात्र जीवन जगण्याची शैली, दर्जा सुधारलेला आहे. त्यामुळे आपल्याकडेही काही प्रमाणात आर्थिक विषमता राहणारच आहे. मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष आजही कायम असून या भागाच्या विकासासाठी नव्याने धोरण ठरविण्याची गरज आहे. असे मत डॉ. दातार यांनी मांडले.

तरुणाईच्या हातीच देशाचे भवितव्य - कुलगुरु
भारत तरुणांचा देश असून मराठवाड्यासारखे विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करावयाचे असतील तर, तरुणांच्या हाती सुत्रे येणे गरजेचे आहे. सर्व गोष्टींसाठी शासनावर अवलंबून न राहता समाज, विद्यापीठ, औद्योगिक क्षेत्र यांनी पुढाकार घेऊन धोरण ठरवावे व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले.

भारतीयांची मानसिकता टेक्‍नॉलॉजी फॉलोअर्सची - डॉ. नाईक
जगात कोणतेही नवीन तंत्रज्ञान बाजारात आले की, सर्वात अगोदर आम्ही त्याचा वापर करीत असतो. एका अर्थाने भारतीय समाज हा टेक्‍नॉलॉजी फोटोअर्स बनला आहे. इनोव्हेशनच्या माध्यमातून नवनिर्मिती व नवे ज्ञान विकसीत झाल्याशिवाय आपली प्रगती अशक्‍य आहे. असे मत माजी प्राचार्य डॉ. बी. एम. नाईक यांनी बीजभाषणात व्यक्‍त केले.

हेही वाचा - 

औद्योगिक प्रश्न, जनहित धोरण व विकास, ग्रामीण विकास, पंचायतराज व रोजगार या पाच विषयावर 50 शोधनिबंध सादर होणार असल्याचे डॉ. धनश्री महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com