मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 'आगळंवेगळं' आंदोलन

उमेश वाघमारे
Wednesday, 20 January 2021

मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही

जालना: मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. याच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टी पिंपळगाव  येथे मंगळवारी (ता.२०) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावात ठिय्या आंदोनल करण्यात आलं. या आंदोलनाची सुरवात गावातून बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी, लेझीम पथक, भजनी मंडळी, महिला, पुरुष व लहान मुलं-मुलींची  रॅली काढू काढण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांकडून मुक मोर्चासह ठोक मोर्चे ही काढण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र, मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वच्च न्यायालयात  न्यायप्रविष्ट आहे. अशात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील साष्टीपिंपळगाव येथे मराठा समाज बाधवांच्या वतीने मंगळवारी (ता.२०) राज्यव्यापी ठिय्या आंदोलन केले जात आहे.

वाळूजमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात, रिक्षाचा चुराडा

या आंदोलनाची सुरवात गावातून रॅली काढून करण्यात आली. या रॅलीत २५ बैलगाड्या, २४ ट्रॅक्टर, वीस दुचाकी, लेझीम पथकाचा समावेश होता. या रॅलीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. महिला, मुली, पुरुष, तरुण या रॅली मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गावा एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं आशा विविध घोषणांनी दुमदुमून निघाले होते. या  रॅली दरम्यान  पोलिस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news jalna maratha reservation aandolan news