esakal | मनसे हेल्‍पलाईनची गरजूंना ‘लाख’मोलाची औषधे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News MNS district president

कोरोनाच्या संकट काळात शहरातील कैलासनगर, संजयनगर, म्हाडा कॉलनी, पडेगाव, नागेश्वरवाडी, समतानगर, उस्मानपुरा, पिसादेवी, छावणी तसेच विविध भागात अडकलेल्या गोरगरीब लोकांना, वयोवृद्ध, अपंग नागरिकांना आणि बाहेरगावाहून शिक्षण व नोकरीसाठी आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळ, सायंकाळी ३०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाचे डबेसुद्धा घरपोच पोचवले जातात

मनसे हेल्‍पलाईनची गरजूंना ‘लाख’मोलाची औषधे

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केले आहे. यातून आरोग्य सेवेला वगळण्यात आले असले तरी, वाहतुक सेवेअभावी वयोवृद्ध, अपंग व्यक्तींना घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळेच मनसे हेल्‍पलाईनतर्फे गरजूंना मोफत आणि घरपोच औषधी पुरवण्यात येत आहेत. दररोज सुमारे ३५० नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत.

मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात आपत्कालीन हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. आरोग्यामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच लहान मुलांचे औषधी किंवा इतर आजारावरील औषधींकरिता वयोवृद्ध अपंग व काही हलाखीची परिस्थिती असणाऱ्या महिलासुद्धा औषधीसाठी हेल्पलाईनकडे फोन करून संपर्क करत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संपर्कानंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेली चिठ्ठी मनसेचे प्रतिनिधी घेतात. मेडिकलमधून स्वतः ती औषधी घेऊन पुन्हा ती औषधी घरपोच मोफत दिली जात आहेत. आठवड्यापासून एक लाख रुपयांपर्यंतच्या औषधी गोळ्या मनसेने हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून वाटप केल्या आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा कार्य करीत राहील, असे श्री. दाशरथे यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हेल्पलाईन सेवेत जिल्हा संघटक वैभव मिटकर, संदीप कुलकर्णी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, संकेत शेटे, विशाल आमराव, वंदे मातरम् सेनेचे समीर लोखंडे, सतबिर सिंघ रंधवा, अमित दायमा, विशाल कारभारे, प्रविण मोहिते, चेतन पाटील, शुभम रगडे, वृषभ रगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

तीनशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था
कोरोनाच्या संकट काळात शहरातील कैलासनगर, संजयनगर, म्हाडा कॉलनी, पडेगाव, नागेश्वरवाडी, समतानगर, उस्मानपुरा, पिसादेवी, छावणी तसेच विविध भागात अडकलेल्या गोरगरीब लोकांना, वयोवृद्ध, अपंग नागरिकांना आणि बाहेरगावाहून शिक्षण व नोकरीसाठी आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळ, सायंकाळी ३०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाचे डबेसुद्धा घरपोच पोचवले जातात.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा