औरंगाबादेत आता मेगा स्मार्ट सिटीझन मोहीम 

माधव इतबारे
Tuesday, 8 December 2020

महापालिका करून देणार नागरिकांना जबाबदारीची जाणीव 

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यापासून शहरात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोशनतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमाला त्या-त्यावेळी नागरिक प्रतिसाद देत आहेत. मात्र काही काळानंतर शहर स्वच्छतेचा विसर पडतो. त्यामुळे आता नागरिकांना स्मार्ट करण्यासाठी ‘मेगा स्मार्ट सिटीझन’ मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (ता. सात) सांगितले. 

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

 

या मोहिमेसाठी एमजीएम हॉस्पिटल, औरंगाबाद फर्स्टसह विविध उद्योजक, स्वयंसेवी संस्था, नागरिक, शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी मोहिमेबाबत रविवारी (ता. सहा) सादरीकरण केले. त्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, पार्किंगची शिस्त नसणे, वाहतूक आणि पाण्याचा अपव्यय या बाबींवर नागरिकांनी काम करून जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत व्याख्यानमाला, ऑडिओ-व्हिडिओ शो आणि पथनाट्यांचे आयोजन करून नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल, असे मत डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्‍त केले.

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

आस्तिककुमार पांडेय कोअर टीमचे प्रमुख असतील. शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, उद्योजक मानसिंग पवार, रणजीत कक्कड यांचा समितीत समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांची होणार परीक्षा  
प्रशिक्षणानंतर नागरिकांची परीक्षा घेण्यात येईल. जे नापास होतील पुन्हा प्रशिक्षण दिले जाईल. उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. औरंगाबाद फर्स्ट उमेदवारांची नोंदणी करून समन्वय ठेवेल तर एमजीएम रुग्णालय प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी मनुष्यबळ पुरवून परीक्षा घेईल. 

(संपादन-गणेश पिटेकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mega Smart Citizen Campaign Aurangabad news