CoronaVirus : महाराष्ट्रातून गेलेल्या मजुरांचे बिहारात बेहाल 

अनिलकुमार जमधडे
Friday, 29 May 2020

महाराष्ट्रच बरा होता म्हणण्याची वेळ, बिहार सरकारचे दुर्लक्ष 

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे अडकलेल्या मजुरांना रेल्वेने पाठविण्यात आले; मात्र आगीतून फुफाट्यात जावे अशीच अवस्था या मजुरांची झाली आहे. बिहारला गेलेल्या या मजुरांना बिहार सरकारनेही वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रापेक्षाही वाईट अवस्था बिहारमध्ये झाल्याची आपबिती मजुरांनी सांगितली. 

लॉकडाउनमुळे अनेक नागरिक महाराष्ट्रात अडकून पडले होते. हजारो नागरिक पायपीट करत आपापल्या शहराच्या दिशेने निघाल्याचे चित्र होते. रेल्वेपटरीवरून पायी जाणाऱ्या मजुरांना रेल्वेने चिरडल्याची घटना घडल्यानंतर मजुरांना त्यांच्‍या राज्यात पोचविण्याच्या कामाला वेग आला. २४ मेरोजी मुजफ्फरपूरला (बिहार) रेल्वे सोडण्यात आली. यामध्ये मराठवाड्यात अडकून पडलेल्या मजुरांना पाठवण्यात आले. मुळात या रेल्वेतील प्रवाशांना प्रवासादरम्यान जेवणासाठी तडफडावे लागले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बिहार सरकारकडून बेदखल

महाराष्ट्रातून बिहारमध्ये गेलेल्या या मजुरांची बिहार सरकारनेही दखल घेतली नाही. रेल्वेस्थानकावर उतरल्यापासून केवळ भरमसाट तपासण्या केल्या, प्रत्यक्षात मात्र रेशन, जेवणाची कुठलीही सोय केली नाही. आम्हाला स्वतःच्या पैशानेच जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. प्रसंगी उपाशीपोटीही राहण्याची वेळ आल्याची माहिती वैजनाथ मुखिया यांनी दिली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

झोपडीत काढतोय दिवस 

बिहारमध्ये शहर वस्तीपासून दूर एका झोपडीत राहून दिवस काढत आहे. तेथे शेल्टर होम किंवा परराज्यातून आलेल्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली नाही; मात्र तुम्ही तुमच्याच घरात राहा असे सांगण्यात आले आहे. औरंगाबादहून परतलेल्या आम्ही दहा ते बारा जणांनी एका झोपडीत सहारा घेतल्याचे मुखिया यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migrant Workers Not Well Situation In Bihar 

टॉपिकस