रन फॉर चेंजसाठी रस्त्यावर धावले हजारो नागरिक 

अनिल जमधडे
रविवार, 12 जानेवारी 2020

किरण, पुजा, गौरव, अश्‍विनी, आशिष व शितलने पटकावले पहिले पारितोषिक 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मिलिंद कला महाविद्यालयाच्या रविवारी (ता. बारा) झालेल्या "मिलींद मॅरेथॉन-2020' स्पर्धेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. स्पर्धेत परभणीच्या धावपटूंनी तीन गटात प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. 

"मिलिंद मॅरेथॉन 2020 रन फॉर चेंज' हे ब्रीद घेऊन आयोजीत केलेल्या मिलिंद मॅरेथॉनची सुरवात उत्साही वातावरणात भिक्‍खुसंघाच्या बुद्धवंदनेने झाली. मॅरेथॉनची सुरवात 10 किलोमिटर रन पासून करण्यात आली. थायलंड येथील भन्ते बुनली, भन्ते विशुद्‌धानंद बोधी. आमदार संजय शिरसाट व मॅरेथॉनच्या मुख्य संयोजक प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. या मेरॉथॉनच्या 10 कि. मी. रन मध्ये पुरुष गटात परभणीच्या किरण म्हात्रे याने 27.50 मिनिटात अंतर पुर्ण करुन प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपये रोख व चषक हे पारितोषिक पटकाविले. द्वितीय क्रमांक आदेश यादव तर तृतीय क्रमांक दिनकर महाले याने मिळवला. 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

दहा किलोमिटर गट 

10 किमी महिला गटात लातुरच्या पुजा श्रीडोळे हिने 36.01 मिनिटात अंतर पार करुन प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपये रोख व चषक मिळवला. द्वितीय क्रमांक गितांजली राऊत तर तृतीय क्रमांक अश्‍विनी बारी हिने मिळवला. 

पाच किलोमिटर गट 

5 किलोमिटर पुरुष गटात पुणे येथील गौरव जाधव याने 14.22 मिनिटात अंतर पुर्ण करुन प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक आकाश परदेशी तर तृतीय क्रमांक छनग बोंबले याने मिळवला. 5 किलोमिटर महिला गटात परभणीच्या अश्‍विनी जाधव हिने 17.10 मिनिटात अंतर पुर्ण करुन प्रथम मिळवला. द्वितीय क्रमांक गजंत्री गायकवाड हिने तर तृतीय क्रमांक अमृता गायकवाड हिने मिळवला. 

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले  

तीन किलोमिटर गट 

3 किलोमिटर पुरुष गटात अकोला येथील आशिष सपकाळ याने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय ललिता गावंडे तर तृतीय क्रमांक संघर्ष खिल्लारे याने मिळवला. 3 किलोमिटर महिला गटात परभणीच्या शितल जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक हर्षदा कदम हिने तर तृतीय क्रमांक अर्चना गर्कळ हिने मिळवला. 

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

ढोल, ताशा अन झुंबाही 

या मॅरेथॉनचा समारोप रन फॉर फन ने करण्यात आला. या मॅरेथॉनचे पारितोषिक वितरण स्टेट बॅंक ऑफ व्यवस्थापक श्री. मेश्राम, डॉ. मंजु जिल्ला, प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, जिल्हा ऍथलॅटिक्‍स संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, सिनेट सदस्य पंकज भारसाखळे यांच्या हस्ते झाले. मॅरेथॉनसाठीची सर्व रोख पारितोषिके पंकज भारसाखळे यांनी प्राचार्य आर. आर. भारसाखळे यांच्या स्मृती प्रित्यार्थ दिली. खेळाडुंचा उत्साह वाढवण्यासाठी ढोल ताशा, झुंबा डान्सचे ही आयोजन करण्यात आले हाते. स्पर्धेला विद्याथी, युवक व खेळाडूंनी भरभरुन प्रतिसाद दिला. 
 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Marathon 2020 Aurangabad