esakal | खासदारांसह कुटुंब होम क्वारंटाइन 
sakal

बोलून बातमी शोधा

खासदारांसह कुटुंब होम क्वारंटाइन 

इम्तियाज जलील यांच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच दिली आहे. माझ्या नातेवाईकाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील स्वॅब देऊन तपासणी केली. पण देवाची कृपा आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आमचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत

खासदारांसह कुटुंब होम क्वारंटाइन 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या एका नातेवाईकाचा कोरोना अहवाल दोन दिवसांपुर्वी पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी स्वतःसह कुटुंबियांचे स्वॅब देखील तपासणीसाठी दिले होते. सुदैवाने सगळ्याचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

तुमच्या सगळ्यांचे आशिर्वाद आणि सदिच्छामुळे माझ्यासह कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तुम्ही सुध्दा काळजी घ्या, लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्या, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे. 

लोकप्रतिनीधी आणि अधिकारी यांच्या बैठकीनंतर शहरात १० ते १८ जुलै दरम्यान, कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या महत्वाच्या बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर राहिल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यांचा लॉकडाऊनला विरोध असल्यामुळेच त्यांनी बैठकीला दांडी मारली असेही बोलले गेले. पण बैठकी पुर्वीच इम्तियाज यांनी माझ्या घरात मेडीकल इर्मजन्सी असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा- तरुणाने स्वतःचे घर दिले होम क्वारंटाईनसाठी

इम्तियाज जलील यांच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच दिली आहे. माझ्या नातेवाईकाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील स्वॅब देऊन तपासणी केली. पण देवाची कृपा आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आमचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

माझी तुम्हाला देखील सर्वांना विनंती आहे, कोरोनाचे कुठलेही लक्षण आढळले, ताप, सर्दी, खोकला जाणवू लागला तर न घाबरता महापालिकेच्या तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करून स्वःताची व कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. इम्तियाज जलील यांच्या नातेवाईकास कोरोना झाल्यानंतर इतरांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले असले तरी नियमाप्रमाणे त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.