esakal | श्रुतीची ‘मिसेस इंडीया’त चमकदार कामगिरी, वायुसेनेत नोकरी करताना यश मिळविणारी ठरली पहिलीच महिला  
sakal

बोलून बातमी शोधा

Misses India World Second Runner Up Shruti Chauhan

वायुदलात नोकरी करीत असताना अशा स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

श्रुतीची ‘मिसेस इंडीया’त चमकदार कामगिरी, वायुसेनेत नोकरी करताना यश मिळविणारी ठरली पहिलीच महिला  

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादच्या तरुणीने मिसेस इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.  भारतीय वायूदलातील पायलट विंग कमांडर श्रुती उदयसिंग चौहान या ‘मिसेस इंडीया’स्पर्धेत तिसरी आल्या आहेत. वायुदलात नोकरी करीत असताना अशा स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबादेत झाले आहे. सध्या त्या गुवाहाटी येथे कार्यरत आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

श्रुती चौहान यांचे शालेय शिक्षण औरंगाबादेतील होली क्रॉस इंग्लिश स्कुलमध्ये झाले आहे. त्यानंतर शहरातीलच देवगिरी महाविद्यालयात त्यांनी बारावीचे शिक्षण घेतले. त्यांचे अभियांत्रिकेचे शिक्षण मुंबईतील ‘एसएनडीटी’ महाविद्यालयात झाले. २०१८ पर्यंत त्यांच्या कुटुंबाचे औरंगाबादेत वास्तव्य होते. २३ जानेवारीला दीव-दमण येथील हॉटेल डाल्टन येथे मिसेस इंडीया स्पर्धा पार पडली.

गुन्हेगारांसोबतचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल, विरोधकांनी केली टीका

दीड हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात पाचशेजणी निवडण्यात आल्या, त्यानंतर दमणमध्ये मुलाखती पार पडल्या व अंतिम पाच मधून स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रंमांक पटकाविला. त्या माजी मंत्री व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देविसिंग चौहान यांची नात आहेत. देशसेवा करतानाच त्यांनी अशा स्पर्धेत नाव कमावले असून त्यांच्या या यशाचे आप्तेष्ट, मित्र परिवारासह सर्वत्र कौतुक होत आहे. 
 

संपादन - गणेश पिटेकर