कर्तव्यनिष्ठ पोलिसांसाठी औरंगाबादची मनसे फिल्डवर

अतुल पाटील
Thursday, 26 March 2020

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आदर करत नागरिकही घरातच आहेत. पोलीस मात्र, भर उन्हात कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्यासाठी औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम सरसावली आहे. मनसैनिकांतर्फे हवाबंद खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात येत आहेत.

औरंगाबाद : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आदर करत नागरिकही घरातच आहेत. पोलीस मात्र, भर उन्हात कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्यासाठी औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम सरसावली आहे. मनसैनिकांतर्फे हवाबंद खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात येत आहेत.

एक नागरिक आणि आपल्यासाठी करत असलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील पैठणगेट, बाबा पेट्रोल पंप, रेल्वेस्टेशन, शहनूरमियाँ दर्गा, अमरप्रीत चौक, मोंढा नाका, उच्च न्यायालय, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी आदी ठिकाणी मनसैनिकांतर्फे खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या वाटल्या जात आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मनसेच्या मोहिमेत जिल्हा संघटक बिपिन नाईक, मनीष जोगदंडे, प्रशांत बजाज, वैभव मिटकर, संदीप कुलकर्णी, प्रशांत दहिवाडकर, किरण जोगदंडे, सागर लबडे, अनिल वाघ यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक हे कार्य करत आहेत. नागरिक या नात्याने पोलिस प्रशासन, वैद्यकीय विभाग, शासकीय यंत्रणा आणि पत्रकारांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रत्येक संकटकाळी पोलिस आपल्या परिवारापासून दूर राहून काम करत असतो. संचारबंदीच्या काळात दायित्व रहावे, यासाठी कुठलाही राजकीय हेतु न ठेवता काम केले जात आहे. संचारबंदी असेपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे.
- बिपिन नाईक, जिल्हा संघटक, मनसे, औरंगाबाद.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On The MNS Field For The Police Aurangabad News