मनपात आरक्षण लाटण्यासाठी वॉर्डाचे विभाजन

अनिल जमधडे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

ब्रिजवाडी संघर्ष समितीचा आरोप 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी मनपाने "मॅनेज' वॉर्ड सोडती काढल्या असल्याचा आरोप ब्रिजवाडी बचाव संघर्ष समितीने केला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!

  राजकारण ढवळले 

महापालिकेच्या राजकारणाने संपुर्ण शहर ढवळून निघाले आहे. महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने गेल्या दोन-तीन वर्षापासून हौशे नवशे बाशींग बांधून बसले आहेत. अनेक कार्यकर्ते जिवाचे रान करुन काम करत आहेत. विद्यमान नगरसेवकांकडून वॉर्डाकडे होणारे दुर्लक्ष आपल्याला फायद्याचे ठरणार या उद्देशाने अनेक वार्डामध्ये कार्यकर्त्यांनी सामाजिक कामांमध्ये वाहून घेतलेले आहे. मात्र नुकत्या झालेल्या वॉर्ड आरक्षणामध्ये महापालिका आणि निवडणूक आयोगाने साटेलोटे करुन वॉर्ड मॅनेज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षीत झाले अनेकांचे वॉर्ड पद्धतीशिरपणे तोडण्यात आले आहेत. वॉर्ड तोडल्याने मुळ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. वॉर्ड रचना बदलल्यामुळे निवडणून येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा : भावी नगरसेवकांच्या सोशलमीडीयावर उड्या 

ब्रिजवाडीकरांचा संताप 

ब्रिजवाडी वॉर्डाच्या अनुसूचित जातींचे आरक्षण लाटण्यासाठीच वॉर्डाचे विभाजन करून वॉर्ड एन-एक चिकलठाणा वॉर्डाला जोडण्यात आला. स्वतंत्र अस्तित्व नसलेला एन-एक वॉर्ड ब्रिजवाडीत समाविष्ट करून स्वतंत्र वॉर्ड झाला आहे. मुळात मसनतपूर हा मुख्य वॉर्ड आहे. त्यात चिकलठाणा एमआयडीसी आणि एन-एक भाग मिळून वॉर्ड राहत आलेला आहे. यावेळेस मसनतपूर ओबीसी महिला वर्गासाठी राखीव होणार असल्याने मसनतपूर वॉर्डापासून एन-एक चिकलठाणा भाग जाणीवपूर्वक वेगळा करण्यात आला. 

हेही वाचा : पंकजा मुंडेंनी पाच वर्षात काय केलं - अजित पवार 

सोयीस्कर केली विभागणी 

शेजारील स्वतंत्र वॉर्ड ब्रिजवाडीला तोडून त्या वॉर्डाच्या आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून नारेगाव, ब्रिजवाडी, चौधरी कॉलनी, चिकलठाणा या भागांची सोयीस्कर विभागणी करण्यात आल्याचा आरोप ब्रिजवाडीतील नागरिकांनी केला आहे. या सोडतीविरोधात आणि मनपाच्या गैरकारभाराविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी नागरिकांनी केली आहे. याविरोधात मनपावर ब्रिजवाडी आणि परिसरातील नागरिकांनी मोठा मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 
घरात सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिलांनो, हे वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal election News Aurangabad