क्षुल्लक वाद उकरून काढला अन् तरुणाचा खूनच केला! 

अनिलकुमार जमधडे
Monday, 27 July 2020


क्षुल्लक वादातून तरुणाचा खून 

पुंडलिकनगरातील घटना ः महिलेसह तीघे अटकेत 

औरंगाबाद ः दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर घराजवळ थांबल्यामुळे संतापलेल्या महिलेने जाब विचारत तरुणाला थापड मारली. त्यानंतर महिलेच्या मुलाने व भावाने तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकुने सपासप वार करत खून केल्याची घटना पुंडलिकनगरात रविवारी (ता. २६) रात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी खून करणाऱ्या एका महिलेसह तिघांना अटक केली. 

गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरमध्ये राहणारा प्रितेश प्रभाकर शिंदे (१८) हा रविवारी रात्री मित्रा सोबत गल्ली नंबर एकमध्ये संशयीत आरोपी राऊत याच्या घराजवळ गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी बेबी राऊत ही महिला आली आणि येथे का थांबलात? असा जाब विचारला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चाकुने सपासप वार

प्रितेश व त्याचे मित्र आम्ही जातो, असे म्हणत असतानाच बेबी राऊत या महिलेने प्रितेशला थापट मारली. त्यामुळे प्रितेश त्या महिलेच्या अंगावर धावून गेला. बहिणीचा आवाज ऐकून भाऊ राजू जनार्दन पैठणकर आणि मुलगा प्रविण राऊत घरातून धावत आले. त्यांनीही शिवीगाळ करत मारहाण केली तर बेबी राऊत या महिलेने प्रितेशचा गळा दाबला. दरम्यान राजूने प्रितेशवर चाकुने सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. बेशुद्ध अवस्थेत प्रितेशला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

पथकाला मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्रितेशचा खून करुन राजू पैठणकर पसार झाला व तो मोंढा परिसरातील जय भवानी नगरात लपला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाला मिळाली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

तीघांनाही अटक

या पथकाने राजूला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम एच.२० ईबी ५६७०) जप्त केली. दुसरीकडे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने बेबी राऊत आणि प्रवीण राऊत या दोघांना अटक केली. खून झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी तीघांनाही अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young man over a trivial dispute