नाथनगर शिवारात घडले धक्कादायक..! पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू

संतोष शेळके
Friday, 31 July 2020

ही घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीच्या उत्तरेकडील डोंगरपायथ्याशी असलेल्या नाथनगर शिवारातील पाझर तलावात घडली. यात समीर शेख मुबारक शेख (१७), शेख अन्सार शेख सत्तारा वय (१७), आतीक युसुफ शेख (१८), तालेब युसुफ शेख (२१) व सोहेल युसुफ शेख (१६) सर्व राहणार (भालगाव ता. औरंगाबाद) यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

करमाड (औरंगाबाद) : मजुरीवर कोबी काढून दिल्यानंतर घरी परतत असताना वाटेत दिसलेल्या तलावात अंघोळ करण्यासाठी उतरलेल्या सतरा-अठरा वर्ष वयोगटातील पाच मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

ही घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीच्या उत्तरेकडील डोंगरपायथ्याशी असलेल्या नाथनगर शिवारातील पाझर तलावात घडली. यात समीर शेख मुबारक शेख (१७), शेख अन्सार शेख सत्तारा वय (१७), आतीक युसुफ शेख (१८), तालेब युसुफ शेख (२१) व सोहेल युसुफ शेख (१६) सर्व राहणार (भालगाव ता. औरंगाबाद) यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

चिकलठाणा पोलीस ठाण्याचे बीट जमादार रविंद्र साळवे यांनी चार मुलास तर अग्निशमन दलाच्या जवानांनी एका मुलास पाण्याबाहेर काढले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह घाटी रूग्णालयात पाठवण्यात आल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

(संपादन- प्रताप अवचार) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathnagar Aurangabad Five youth for swimming drowned in the lake