निवृत्त शिक्षिकेचे मंगळसूत्र धूम स्टाईलने हिसकावले

प्रकाश बनकर
मंगळवार, 21 जानेवारी 2020

एकादशीनिमित्त आयोजित पारायणाच्या कार्यक्रमातून घराकडे परत जाणाऱ्या निवृत्त शिक्षिकेचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम स्टाईलने हिसकावले.

औरंगाबाद : एकादशीनिमित्त आयोजित पारायणाच्या कार्यक्रमातून घराकडे परत जाणाऱ्या निवृत्त शिक्षिकेचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम स्टाईलने हिसकावले. सोमवारी (ता. 20) सायंकाळी साडेपाच वाजता समर्थनगरात ही घटना घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

प्रभावती पांडुरंग पाटील (68, रा. शारदाश्रम कॉलनी) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्या सोमवारी दुपारी समर्थनगरातील देशमुख यांच्या घरी आयोजित पारायणाच्या कार्यक्रमासाठी गेल्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पायी घराकडे निघाल्या. समर्थनगरातील मोरे यांच्या क्‍लासेससमोर येताच दुचाकीस्वार चोरटे त्यांच्याजवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने पाटील यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि धूम स्टाईलने पोबारा केला. प्रसंगावधान राखून प्रभावती पाटील यांनी पॅंडल घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे साडेतीन तोळ्यांची साखळी चोरट्यांच्या हाती गेली. पॅंडल तेवढे वाचले. पाटील यांनी बरीच आरडाओरड केली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

हेही वाचा -  मनसे कार्यकर्ते स्वगृही

सीसीटीव्ही फुटेज हस्तगत 
दुचाकीस्वार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यांची ओळख पटविणे सोपे झाले आहे. पाठीमागील चोराने मात्र चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा - कर्जमुक्‍तीसाठी 40 हजारांवर शेतकऱ्यांनी केली आधार जोडणी

मंगळसूत्र चोरीच्या घटना थांबेनात 
मंगळसूत्र चोरीच्या घटना शहरात नव्या नाहीत. 2018 मध्ये शहरात 20 मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर जानेवारी ते नोव्हेंबर 2019 यादरम्यान 44 मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या. यात प्रमुख्याने सातारा, सिडको, जवाहरनगर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. दरवर्षी मंगळसूत्र चोरीचे प्रकार वाढतच चालले आहेत. ज्या तुलनेत या घटना घडतात, त्याच वेगाने तपास होताना दिसत नाही. 

हेही वाचा -का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

हेही वाचा -वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Necklace Snatching Aurangabad