हिरव्या-भगव्यावरून चंद्रकांत खैरे टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्री. खैरे यांनी "हिरवे-भगवे'विषयी वक्तव्य केले, ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही, अशी टीका राजू शिंदे यांनी केली. कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत शिंदे यांनी शिवसेनेला "टार्गेट' केले. 

औरंगाबाद-शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांची तू-तू-मैं-मैं सुरू आहे. मंगळवारी (ता. सात) देखील उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांना चिमटे काढले.

राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर जिल्ह्याला दोन मंत्रीमदे मिळाली मात्र शिवसेनेला अभिनंदनाच्या प्रस्तावाचा विसर पडला, असा टोला लगावत भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी "हिरव्या-भगव्या'वरून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचे कारण पुढे करत भाजपचे विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला व महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा भाजपने केली. त्यावर शिवसेनेनेही युतीत पदावर बसलेले भाजपचे स्थायी समिती सभापती व विषय समिती, प्रभाग समिती सभापती राजीनामा कधी देणार? असा प्रश्‍न करत भाजपला टार्गेट केले.

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

दरम्यान गेल्या दोन-तीन सभांपासून शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडत आहेत. मंगळवारी झालेल्या सभेतही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी केला. उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विजयी झाल्यानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा झाली. सुरवातीलाच शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी श्री. जंजाळ यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शिवसेनेच्या ज्योती पिंजरकर यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांवर शिवसेनेचे नगरसेवक बसण्याचा हा सुवर्णयोग आहे.

त्यामुळे आगामी काळात चांगली कामे होतील. पाणी पुरवठा योजना मार्गी लागून नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, असे वक्तव्य केले. त्यावर भाजपचे राजू शिंदे यांनी दोन्ही पदावर शिवसेनेचे नगरसेवक बसल्यानेच शहराला पाणी मिळणार असेल तर यापूर्वीच श्री. जंजाळ यांना पदावर बसविले असते! भाजपने उपमहापौरपदाची निवडणूक गांभीर्याने लढलेली नाही, असा दावा शिंदे यांनी केला. त्यावर जंजाळ यांनी ते सर्व जनतेने पाहिले आहे, असा टोला लगावला. जंजाळ उपमहापौरपदी बसल्याने आता महापौरांची अडचण होईल, असा चिमटाही भाजप नगरसेवकांनी काढला. त्यावर जंजाळ यांनी तुमची मनोकामना कधीच पूर्ण होणार नाही. श्री. घोडेले आमच्यासाठी वरिष्ठ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील, अशी कोटी केली.

काय सांगता - सत्तारांना थेट मुख्यमंत्रीच व्हायचंय?

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्री. खैरे यांनी "हिरवे-भगवे'विषयी वक्तव्य केले, ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही, अशी टीका राजू शिंदे यांनी केली. कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत शिंदे यांनी शिवसेनेला "टार्गेट' केले. 
 
एमआयएमने फोडली कोंडी 
गेल्या दोन-तीन सर्वसाधारण साधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयांऐवजी शिवसेना-भाजपमधील राजकारणच जास्त रंगत असल्याने पहिल्यांदाच एमआयएच्या नासेर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला. तुमच्या एकमेकांवरील कुरघोड्या खूप झाल्या. आम्ही हेच ऐकत बसायचे का? शहराच्या विकासाचे प्रश्‍न घ्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर भाजप नगरसेवकांनी शांत राहत विषय पत्रिकेवरील विषय घेण्याची मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Chandrakant Khair