७३ लाख वीजग्राहकांनी भरले बाराशे कोटी ऑनलाइन बिल 

अनिलकुमार जमधडे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

 लॉकडाऊनमुळे वाढला आँनलाईन भरणा 

औरंगाबाद : लॉकडाऊन असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी घरी बसून १,२२७ कोटी २५ लाख रुपयांचे बिल ऑनलाइन भरले. यामध्ये औरंगाबाद परिमंडलातील २ लाख ३० हजार वीजग्राहकांचा समावेश आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सद्यःस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रही बंद आहेत. वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ऑनलाइन पर्यायांद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. गेल्या मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १,२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

परिमंडलनिहाय ग्राहक संख्या व रक्कम पुढीलप्रमाणे 

पुणे– १३.५० लाख ग्राहक – २६६.२९ कोटी 
भांडूप– १०.९९ लाख – २३३.६० कोटी 
कल्याण– १०.२५ लाख – १६४.३९ कोटी 
नाशिक– ५.६५ लाख – ९४.४१ कोटी 
बारामती– ५.६३ लाख – ७१.०९ कोटी 
कोल्हापूर– ४.२२ लाख – ८४.९६ कोटी 
नागपूर– ४.०५ लाख – ७०.७५ कोटी 
जळगाव- ३.२५ लाख – ४७.८७ कोटी 
औरंगाबाद– २.३० लाख – ४३.७५ कोटी 
अकोला– २.२७ लाख – २७.१० कोटी 
अमरावती- २.२१ लाख – २३.४८ कोटी 
लातूर- १.९२ लाख – २५.५३ कोटी 
कोकण- १.८८ लाख – २२.९२ कोटी 
चंद्रपूर- १.७९ लाख – १५.३६ कोटी 
गोंदिया- १.७९ लाख – १२.८२ कोटी 
नांदेड- १.५८ लाख – २२.९१ कोटी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Mahavitran Aurangabad