CoronaVirus : विजेची तीस टक्क्यांनी घटली मागणी 

photo
photo

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे प्रथमच औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये तब्बल १३३ दशलक्ष युनिटची मागणी घटली असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. 

२२ मार्चला जनता कर्फ्यू होता. त्यानंतर लगेचच लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून लॉकडाउन चौथ्या टप्प्यात गेला आहे. लॉकडाउन परिस्थिती असल्यामुळे राज्यभरात उद्योग-व्यवसाय बंद आहेत. सध्या सर्वच उद्योग-व्यापार, व्यवसाय बंद करण्यात आलेले आहेत. प्रत्येक नागरिकाने घरातच राहावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 

विजेची मागणी घटली

नागरिकांनी अधिकाधिक घरात राहावे यासाठी विविध पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत विजेची एकूण मागणी साधारण तीस टक्क्यांनी घटली आहे. औरंगाबाद परिमंडळात म्हणजे औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये १३३.७६४ दशलक्ष युनिटने विजेचा वापर घटला आहे. 

अशी आहे परिस्थिती 

वीजवापर (दशलक्ष युनिट) 
 
मार्च-२०२० 

औरंगाबाद शहर मंडळ - १६८.१६ 
औरंगाबाद ग्रामीण मंडळ - ३०२.२१ 
जालना मंडळ - २९८.२७ 
एकूण औरंगाबाद परिमंडळ - ७६८.६५४ 

एप्रिल-२०२० 

औरंगाबाद शहर मंडळ - १२२.७१ 
औरंगाबाद ग्रामीण मंडळ - २६७.९५ 
जालना मंडळ - २४४.२२ 
एकूण औरंगाबाद परिमंडळ - ६३४.८९ 

यंत्रणा अधिक सतर्क 

लॉकडाउनमुळे नागरिक घरामध्ये आहेत. त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. अवकाळी पावसाने दोन महिन्यात दोनवेळा हजेरी लावली. या काळात तर महावितरणसमोर मोठे आव्हान होते. अनेक ठिकाणी महावितरणच्या खांबांवर झाडे तुटून पडल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू होते, मात्र महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी तसेच खासगी एजन्सीचे कर्मचारी, अधिकारी यांनी अविरत परिश्रम घेत या काळात विजेचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी प्रयत्न केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com