त्या रात्री तिला लॉजवर नेले मग फोटो व्हायरल झाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

अनिलने म्हैसमाळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे लक्षात आले. तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली मात्र अनिलने ज्या मोबाईलमधून फोटो काढला तो मोबाईल आणि तरुणीचा मोबाईल परत दिला. यापुढे होणार नाही, असा दोघांमध्ये समझोता झाला, मात्र अनिलने तरुणीचे फोटो पुन्हा अपलोड केल्याचे निदर्शनास आल्याने तरुणीने शिऊर पोलिस ठाण्यात अनिलविरोधात तक्रार दिली.

औरंगाबाद -लग्नाचे आमिष दाखवून 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी मंगळवारी (ता. चार) अटक केली. अनिल चांदवडे असे त्या संशयिताचे नाव आहे. 

वैजापूर तालुक्‍यातील 19 वर्षीय तरुणी शिक्षणानिमित्त औरंगाबादेत राहत होती. तिची अनिल चांदवडे (21, रा. खापरखेडा, ता. कन्नड) याच्यासोबत ओळख झाली.

तो मोबाईलवरून तरुणीशी संवाद साधत होता. दरम्यान, अनिलने विश्‍वास संपादन केल्यानंतर एक दिवस तिला म्हैसमाळ येथील लॉजवर नेले. दरम्यान, अनिल आणि त्याचा भाऊ या दोघांनी एका खोलीत बसून दारू प्यायला लागले.

त्यावेळी तरुणीने मला गावी जाण्यास उशीर झाला, मी जाते, असे म्हटल्यावर अनिलने त्याच्या भावाला खोलीतून काढून दिले. तरुणीला खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केले आणि मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे, असे म्हणत तरुणीचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढले. 

सोशल मीडियावर व्हायरल 

अनिलने अश्‍लील छायाचित्रे काढून ती फेसबुकवर अपलोड केली. फोटो तरुणीच्या चुलत भावाने पाहिल्यानंतर त्याने विचारणा केली त्यावेळी अनिलने म्हैसमाळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे लक्षात आले.

तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली मात्र अनिलने ज्या मोबाईलमधून फोटो काढला तो मोबाईल आणि तरुणीचा मोबाईल परत दिला. यापुढे होणार नाही, असा दोघांमध्ये समझोता झाला, मात्र अनिलने तरुणीचे फोटो पुन्हा अपलोड केल्याचे निदर्शनास आल्याने तरुणीने शिऊर पोलिस ठाण्यात अनिलविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 

गुन्हा खुलताबाद तालुक्‍यात घडल्यामुळे तो गुन्हा शिऊर पोलिस ठाण्यातून वर्ग करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक जगदीश सातव यांनी तपास करून अनिल चांदवडेला 4 फेब्रुवारी रोजी अटक केली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी आरोपी चांदवडे याला सोमवारपर्यंत (ता. दहा) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी सुनावणीदरम्यान युक्तिवाद केला. 

हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...  
त्या आमदारांना बांगड्या पोस्टाने पाठवणार, विद्यार्थी संघटनांचा आक्रोश 

अन्‌ आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोण चिखलीकर....   

पंकजा मुंडेच्या आंदोलनावर टिकेची झोड, तरीही प्रशांत बंब बोलवणार लोकप्रतिनिधीची बैठक  

सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nineteen Year Old Girl Raped In A Lodge Aurangabd News