esakal | बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खूलासा, महेबूब शेख यांच्याविरुद्ध तांत्रिक पुरावा आढळला नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

औरंगाबादेतील पीडित महिलेच्या चर्चित बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासासमोर आला आहे. पीडितेने संशयिताविरुद्ध तक्रार दिली; परंतू तक्रारीनुसार, महेबूब शेख यांच्यासबंधित कोणतेही तांत्रिक पुरावे समोर आले नाहीत.

बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खूलासा, महेबूब शेख यांच्याविरुद्ध तांत्रिक पुरावा आढळला नाही!

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेतील पीडित महिलेच्या चर्चित बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासासमोर आला आहे. पीडितेने संशयिताविरुद्ध तक्रार दिली; परंतू तक्रारीनुसार, महेबूब शेख यांच्यासबंधित कोणतेही तांत्रिक पुरावे समोर आले नाहीत. तसेच महेबूब शेख व पीडितेचे टॉवर लोकेशनही एक नसल्याची बाबही समोर आली. या प्रकरणात तीन पथके तपासकार्य करीत आहे व तपासही सहायक पोलिस आयुक्तस्तरावर देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी गुरुवारी (ता.३१) दिली. औरंगाबादेतील सिडको पोलिस ठाण्यात २९ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, मुंबईत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ट्यूशन घेणाऱ्या शिक्षिका तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली.

यात महेबूब इब्राहिम शेख असे संशयिताचे नाव आहे. याच नावाचे व्यक्ती शिरूर कासार येथे आहे व ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिरुर कासार येथील महेबूब शेख यांनी स्वतः फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करून हा खोटा गुन्हा नोंद केल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यात त्यांनी असे नमुद केले की, ‘‘ज्या महिलेने फिर्याद दिली तिला मी कधीही भेटलेलो नाही. मी तिला कधीही फोन केलेला नाही. फिर्यादीनुसार १० नोव्हेंबरला महेबूब शेख यांच्या फ्लॅटवर भेट झाली असे नमूद आहे परंतु, प्रत्यक्षात मी १० नोव्हेंबरला मुंबईत पक्ष कार्यालय आणि मंत्रालयात होतो. १४ नोव्हेंबरलाही माझ्या गावी होतो. मला महिलांबाबत प्रचंड आदर असून महिलांसोबत चुकीचे कधी वागत नाही. जर या गुन्ह्यात संबंध असला तर मी नार्को टेस्टसाठीही तयार आहे. खोटा गुन्हा नोंदविणारा कोण? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा.’’ अशी मागणीही महेबूब शेख यांनी व्हिडिओतून केली होती. पोलिसांचा तपासही सुरु आहे. त्यानंतर आता नवीन खुलासा पुढे आला आहे.उपायुक्त दीपक गिऱ्हे म्हणाले, ‘‘आजपर्यंत झालेल्या तपासामध्ये पीडित महिला व संशयित यांच्या मोबाईलचे एक वर्षापासूनचे कॉल डिटेल पोलिसांनी तपासले. त्यांच्यात संभाषण झाले नाही. त्यांचे मोबाईल एकाच टॉवर खाली कधीही आले नाही. तरीही  या प्रकरणात सर्व पातळीवर कसून तपास करीत आहोत. तपासात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनूसार, कोणताही तांत्रिक पुरावा समोर आला नाही. पण आम्ही सर्व पातळीवर तपास करीत आहोत.

संपादन - गणेश पिटेकर