
कोरोना काळात दिलासा ः दिवाळीत मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष नको
औरंगाबाद : एकूणच कोरोना काळात ऑक्टोबर महिना सर्वांसाठी दिलासादायक ठरला असून या काळात जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या अगदी नगण्य असून ती ०. ८६ वर आली आहे. रिकव्हरी रेटही तब्बल ९६. ३२ वर पोचला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ऑक्टोबर हिट ठरला असून आता पुन्हा फिट राहायचे आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाचा संसर्ग कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे. टेस्टींगही कमी झाल्याचे कारण काहीअंशी असु शकते परंतू इतक्यात व सहजासहजी कोरोना विषाणूचा नायनाट होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे लाट कमी झाली असली तरी पुन्हा लाट येईल ही शक्यता धरुनच येणाऱ्या संभाव्य लाटेविषयी जागरुक राहून काळजी घेणे श्रेयस्कर राहील, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. १ ऑक्टोबरला रुग्णसंख्या ३३ हजार ८४४ होती. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ८६ होती, तसेच मृतांची संख्या ९४१ वर पोचली होती. एकूण बरे झालेले रुग्ण २७ हजार ८४१ होते. यानंतर एक महिण्यांनी सर्व चित्र सुखकारक झाले आहे. परिस्थीती पूर्वपदावर येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एक नजर...
ऑक्टोबरपूर्वी - त्यानंतर आजची स्थिती
-१५. ०२ टक्के रुग्ण अॅक्टीव्ह- आता ०. ८६ टक्के रुग्ण अॅक्टीव्ह
-मृत्यूदर २. ७८ होता - आता २. ८०
-रिकव्हरी रेट ८२. १८ होता - आता ९६. ३२
मोठा दिलासा
ऑक्टोबरनंतर कोरोनाबाबत मोठा दिलासा औरंगाबादकरांना मिळत आहे. ऑक्टोबर महिण्यात रिकव्हरी रेटमध्ये मोठी वाढ दिसून आली. ३१ दिवसांत ४ हजार ३६६ रुग्ण बाधित आढळले; परंतू तब्बल ८ हजार ९९३ जणांना डॉक्टरांनी बरे केले. रिकव्हरी बाधित रुग्णांच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली. मृत्यूदरात मात्र ०.२ टक्क्यांनी वाढ झाली. अॅक्टीव्ह रेटही कमी झाला. त्यामुळे हा काळा ऑगस्ट-सप्टेंबरच्या तूलनेत दिलासादायक काळ ठरत आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोरोना हद्दपार झाला व आता आपण मोकळे झालो अशा गैरसमजात अनेकजण वर्तन करीत आहेत. पण दीवाळीत बाजारपेठातील गर्दी, खरेदीची गर्दी व इतर कारणांनी सुरक्षितता पाळण्यात दिरंगाई होऊ शकते. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे सुरक्षितता पाळणे योग्य राहील.
(संपादन-प्रताप अवचार)