कोरोना..या डॉक्टरने करायचं नव्हतं तेच केलं!

चंद्रकांत तारु
शुक्रवार, 20 मार्च 2020

सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पथकाने बुधवारी (ता. 18) ला दाम्पत्याच्या घरी भेट दिली. त्यात त्यांना कोरोन  नसल्याचे स्पष्ट करुन प्रमाणपत्रही दिले. असे असताना डॉ. गजानन सासणे यांनी या दाम्पत्याच्या शहरातील एका नातेवाईकाला मोबाईल करुन तुमचे नातेवाईक अमेरिकेहून आले असुन त्यांना कोरोनाची लागण झाली व त्यांना वैद्यकीय सरकारी यंत्रणेने ताब्यात घेवुन औरंगाबादला नेले असल्याचे सांगितले.

पैठण : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव वाढत असतानाच अमेरिकेहून पैठण येथे गावी परत आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देवुन  अफवा पसरविणाऱ्या  पैठण येथील डॉक्टरविरुध्द पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) गुन्हा दाखल केला आहे. 

बदनामी केल्याबाबतची तक्रार पैठण पोलिस ठाण्यात शुक्रवारी प्राप्त झाली होती. त्यानुसार डॉ. अनिल सासणे असे गुन्हा नोंद झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, पैठण शहरातील भवानीनगर येथील दाम्पत्याचा मुलगा व सुन गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत नौकरी निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यामुळे  या दांम्पत्याचे नेहमी अमेरिकेत जाणे येणे असते. सात जानेवारीला हे दांम्पत्य अमेरिकेहून पैठण येथे आले. यानंतर कोरोनामुळे पैठण येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पथकाने बुधवारी (ता. 18) ला दाम्पत्याच्या घरी भेट दिली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यात त्यांना कोरोन  नसल्याचे स्पष्ट करुन प्रमाणपत्रही दिले. असे असताना डॉ. गजानन सासणे यांनी या दाम्पत्याच्या शहरातील एका नातेवाईकाला मोबाईल करुन तुमचे नातेवाईक अमेरिकेहून आले असुन त्यांना कोरोनाची लागण झाली व त्यांना वैद्यकीय सरकारी यंत्रणेने ताब्यात घेवुन औरंगाबादला नेले असल्याचे सांगितले.

दरम्यान या अशा सांगण्यातून या दाम्पत्याच्या नातेवाईक व समाजातील लोकांना पर्यंत कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरल्यामुळे समाज व नातेवाईकात बदनामी झाली तसेच समाज व नातेवाईक संशयित म्हणून बघत असल्याचे  देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीची दखल घेवुन पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी डॉ. अनिल सासणे यांच्याविरुध्द अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -
शाब्बास महाराष्ट्र! पाच कोरोना पॉझिटीव्ह झाले निगेटिव्ह, लवकरच जाणार घरी 

हे घेऊन फिरु नका; पोलिस करणार कारवाई!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ofence Registered Against Doctor At Paithan