औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश

मनोज साखरे
Saturday, 31 October 2020

औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतची यादी शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरा जारी झाली. यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्यांची इतर जिल्ह्यात बदली झाली. जिल्हा वाहतुक नियंत्रण विभागाचे मुकुंद आघाव व चिकलठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे, गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक भगतसिंह दुलत यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. महेश आंधळे यांची बीड येथे तर त्यांच्या जागी विरगाव येथील अधिकारी विश्वास पाटील यांची बदली झाली.

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

पोलिस अधीक्षकांचे जनसंपर्क अधिकारी विवेक जाधव यांची शहरात बदली झाली. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले. विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या मुलाखती घेऊन बदल्यांची यादी तयार केली. शुक्रवारी रात्री उशिरा ७८ अधिका-यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. एकाच पोलिस ठाण्यात दोन वर्षे आणि परिक्षेत्रात आठ वर्षे सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे.

वैजापुरचे अनंत कुलकर्णी यांची शासन स्तरावर बदली झाली. पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांची ग्रामीण पोलिस दलात बदली झाली असुन त्यांना अद्याप पोलिस ठाणे देण्यात आले नाही. जिल्हा बदलीअंतर्गत अनंत कुलकर्णी यांच्या जागेवर फुलंब्रीचे सम्राटसिंह राजपूत, त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे अशोक मुदीराज यांची बदली झाली.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

शहर पोलिस दलातील उपनिरीक्षकांच्या बदल्या
शहर आयुक्तालयातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गुन्हे शाखेतील विजय जाधव व विजय पवार यांची अनुक्रमे जिन्सी व सिटी चौक पोलिस ठाण्यात बदली झाली. जिन्सी ठाण्याचे दत्ता शेळके यांची विशेष शाखेत, सिडको ठाण्यातील पवन इंगळे यांची गुन्हे शाखेत बदली झाली. सिटीचौक ठाण्याचे अमरनाथ नागरे यांची एमआयडीसी सिडको येथे, छावणीचे अतुलकुमार ठोकळ यांची हर्सूल येथे तसेच पांडुरंग भागिले यांची छावणी पोलिस ठाण्यात बदली झाली. सेफ सिटी व दामिनी पथकाच्या स्नेहा करेवाड व अर्ज शाखेतील एकनाथ इंगळे यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. जिन्सीला नव्याने शहरात बदलून आलेले राजेश मयेकर यांची दुय्यम निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच जनार्धन साळुंके यांची वाळुज वाहतूक शाखेत तर महिला सहाय्य कक्षाच्या निरीक्षक किरण पाटील यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers Of Aurangabad Police Region Transferred