लॉकडाऊनमध्ये दारु चोरली अन् अनलॉकमध्ये अटक झाली! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

दारुचे गोडाऊन फोडून साडेचार लाखांची दारू चोरुन नेल्याप्रकरणी तब्ब्ल अडीच महिन्यांनी गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले. ज्ञानेश्र्वर रावसाहेब पिंपळे (३८, रा. चौधरी कॉलनी, दत्तनगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. 

औरंगाबाद: दारुचे गोडाऊन फोडून साडेचार लाखांची दारू चोरुन नेल्याप्रकरणी तब्ब्ल अडीच महिन्यांनी गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले. ज्ञानेश्र्वर रावसाहेब पिंपळे (३८, रा. चौधरी कॉलनी, दत्तनगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..

प्रकरणात शीतल हसानंद माकिजा (६१, रा. रोपळेकर हॉस्पीटल जवळ, सम्राटनगर) यांची पंढरपूर येथील शितल वाईन एजन्सी असून १३ ते १४ एप्रिलदरम्यान चोरट्यांनी सदर एजन्सी फोडून चार लाख ५१ हजार ५६० रुपये किंमतीचे दारुचे बॉक्स चोरले तर पाच लाख ११ हजार २०० रुपयांच्या दारुच्या बॉक्सला आग लावून नुकसान केले होते. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन आरोपी बाळु पिंपळेला अटक केली. त्याने महेश काळे, ज्ञानेश्वर पिंपळे व चंद्रभान पिंपळ व इतर तीन जणांसोबत मिळून गोडावून फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख २८ हजार २० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी बाळूची न्यायालयाने पोलिस कोठडी दरम्यान न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. 

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

तब्बल अडिच महिन्यांनी मंगळवारी (ता.३०) पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार तथा आरोपी ज्ञानेश्र्वर पिंपळे याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता आरोपीला ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे-तांबडे यांनी मंगळवारी (ता. ३०) दिले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयाकडे केली. 

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested In Liquor Theft Case Aurangabad News