esakal | CoronaBreaking : औरंगाबादेत हजारी पार @१०२१, आज ५९ ने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News

औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नको असलेले संकट शहरात अधिकच घोंघावताना दिसत आहे. आज औरंगाबादने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा एक हजारांचा टप्पा ओलांडला. सोमवारी (ता.१८) सकाळी ५९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ हजार २१ झाली.

CoronaBreaking : औरंगाबादेत हजारी पार @१०२१, आज ५९ ने वाढ

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नको असलेले संकट शहरात अधिकच घोंघावताना दिसत आहे. आज औरंगाबादने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा एक हजारांचा टप्पा ओलांडला. सोमवारी (ता.१८) सकाळी ५९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ हजार २१ झाली.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

कोरोनाचा एक हजारांवर रुग्णांना संसर्ग अत्यंत वेदनादायी ही बाब असून मराठवाड्यातही रुग्णसंख्या वाढती असल्याने हे चिंताजनक आहे. त्यामुळे समस्त औरंगाबाद आणि मराठवाडावासियांनी काळजी आणि जबाबदारी घेण्याची गरज आहे.

आज ५९ रुग्णांची वाढ
औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) पैठण गेट, सब्जी मंडी (१), किराडपुरा (१), सेव्हन हिल कॉलनी (१), एन-६ सिडको (१), बायजीपुरा (१), रोशन नगर (१), न्याय नगर (३), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.२ (४), हुसेन कॉलनी (४), पुंडलिक नगर (२), हनुमान नगर (१), संजय नगर, गल्ली नं. पाच (१), हिमायत बाग, एन-१३ ‍सिडको (१), मदनी चौक (२), सादाफ कॉलनी (१), सिल्क मील कॉलनी (८), मकसूद कॉलनी (६), जुना मोंढा (११), भवानी नगर (५), हिमायत बाग, जलाल कॉलनी (३), बेगमपुरा (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये २७ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

असा आहे कोरोना मीटर
उपचार घेणारे रुग्ण -६६३
बरे झालेले रुग्ण -३२७
एकूण मृत्यू    -३१
एकूण रुग्णसंख्या -१०२१

डॉक्टरांनी दिले कोरोना बाधित रुग्णांना जीवदान
 ६४ वर्षीय आसेफिया कॉलनी टाऊन हॉल येथील रुग्ण २४ एप्रिलला रात्री अकरा वाजता घाटी येथील भरती झाला. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांना बऱ्याच दिवसांपासून दम्याचा आजार होतात त्यांना कोविड -१९ मुळे दोन्ही फुफुसांचा न्यूमोनिया झाला होता. त्यांची अत्यंत गंभीर प्रकृती होती.

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ४० ते ८० टक्के इतके असायचे.  त्यांच्यावर घाटीतील डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले. त्यांना रविवारी (ता. १७) सायंकाळी चोवीस दिवसानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  डॉक्टरमुळे त्यांना जीवदान लाभले आहे.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

go to top