औरंगाबादेत कोरोनासुराचा कहर सुरूच @१०७३, आज ५१ पॉझिटिव्ह

मनोज साखरे
Tuesday, 19 May 2020

हरातील सर्वच भागात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत आहे. आज (ता. १९) सकाळी तब्बल ५१ रुग्णांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून आता औरंगाबादची रुग्णसंख्या १०७३ झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील सर्वच भागात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत आहे. आज (ता. १९) सकाळी तब्बल ५१ रुग्णांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून आता औरंगाबादची रुग्णसंख्या १०७३ झाली आहे. २७ एप्रिलपासून आजपर्यंत १०२० रुग्ण वाढले असूआधीच्या ४२ दिवसात  ५३ रुग्ण होते. हे विशेष! औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.१८) ६० रुग्ण आढळले. याच दिवशी हजाराचा टप्पा ओलांडला. आज (ता.१९) सकाळी ५१ रुग्ण वाढले असून दोन दिवसात १११ रुग्ण वाढले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आज ५१ रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेले रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या)
रोहिदास नगर (१), शिवशंकर कॉलनी (१),  जाधववाडी (१),  जटवाडा रोड (१), हिमायत बाग (१), किराडपुरा (४), पुंडलिक नगर (१), मुकुंदवाडी (१), नारेगाव (१), जयभीम नगर (१), संजय नगर (१), रहिम नगर (१), कैलास नगर (१), गादल नगर (१),  सादात नगर, गल्ली नं. ६ (४), शिवनेरी कॉलनी (१), विद्या नगर, सेव्हन  हिल (१), गल्ली नं. २५, बायजीपुरा (४), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (१), मकसूद कॉलनी (१), जाधववाडी (१), गल्ली नं. २३, बायजीपुरा (२), गल्ली नं. ३, बायजीपुरा (१), सातारा गाव (३), आदर्श कॉलनी, गारखेडा (३), गारखेडा परिसर (१), मित्र नगर (१), मिल कॉर्नर(१), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (१), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (१) अन्य (४) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काल या भागात आढळले होते ६० रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या)
पैठण गेट, सब्जी मंडी (१), किराडपुरा (१), सेव्हन हिल कॉलनी (१), एन-६ सिडको (१), बायजीपुरा (१), रोशन नगर (१), न्याय नगर (३), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.२ (४), हुसेन कॉलनी (४), पुंडलिक नगर (२), हनुमान नगर (१), संजय नगर, गल्ली नं. पाच (१), हिमायत बाग, एन-१३ ‍सिडको (१), मदनी चौक (२), सादाफ कॉलनी (१), सिल्क मील कॉलनी (८), मकसूद कॉलनी (६), जुना मोंढा (११), भवानी नगर (५), हिमायत बाग, जलाल कॉलनी (३), बेगमपुरा (१), रोशनगेट (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये २७ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.

एकूण ३४० रुग्ण झाले बरे
सोमवारी एकूण ५ जण कोरोनामुक्त झाले. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. आता एकूण ३४० रुग्ण बरे झाले आहेत.  

असा आहे कोरोना मीटर
उपचार घेणारे रुग्ण - ६९९
एकूण मृत्यू            - ३४
बरे झालेले रुग्ण     - ३४०
एकूण रुग्ण         -   १०७३

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Thausand Seventy Three CoronaVirus Positive Patient Auranngabad News