वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं प्रकरण

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

औरंगाबाद : पतीचा मोबाईल फोन रात्री साडेदहाला घरी देण्यासाठी आलेला आणि विवाहितेचा विनयभंग करणारा पतीचा मित्र तथा व्यापारी आरोपीला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी ठोठावली. अंकुश खंबाट असे त्या आरोपीचे नाव आहे. 

औरंगाबाद : पतीचा मोबाईल फोन रात्री साडेदहाला घरी देण्यासाठी आलेला आणि विवाहितेचा विनयभंग करणारा पतीचा मित्र तथा व्यापारी आरोपीला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी ठोठावली. अंकुश खंबाट असे त्या आरोपीचे नाव आहे. 

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

या प्रकरणी शहरातील 27 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीचा पती व शिक्षा ठोठावण्यात आलेला व्यापारी अंकुश खंबाट (28) हे मित्र होते. 24 एप्रिल 2015 रोजी रात्री साडेदहाला अंकुश हा फिर्यादीच्या पतीचा मोबाईल फोन देण्यासाठी फिर्यादीच्या घरी गेला होता. त्यावेळी फोन देताना अंकुशने "वहिनी, तू मला फार आवडतेस' असे म्हणत फिर्यादीचा विनयभंग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर अंकुश पळून गेला. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

हेही वाचा - शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा

सहा साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वपूर्ण 
खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये फिर्यादीसह तिच्या अन्य एका नातेवाईकाची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने अंकुश खंबाट याला भारतीय दंड संहितेच्या 354 कलमान्वये एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून एस. बी. भागडे यांनी काम पाहिले. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one year jail in matter of Sexual Harassment