ओ पोलिसमामा, जुगारी घरी बसून लावताहेत आकडे

बाळासाहेब लोणे 
Sunday, 29 December 2019

मोबाइलवर सांकेतिक भाषेतून व्यवहार केला जातो. एकसाठी एक्का, पाचला पंजा, सहासाठी छक्का, दोनसाठी दुर्री, सातसाठी 'लंगडा', दहासाठी मेंढी तर.... 

गंगापूर (जि. औरंगाबाद) : ऑनलाइन बँकिंग पाठोपाठ मटकाही ऑनलाइन झाला आहे. आकडेबहाद्दर घरबसल्या स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉपच्या साहाय्याने मटका खेळत असून, त्यांना अटकाव करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

मटका खेळणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या खेळावर पोलिस प्रशासनाकडून वारंवार कारवाई केली जाते. परिणामी, कारवाई टाळण्यासाठी मटका बुकींनी ऑनलाइन खेळांचा आधार घेतला आहे. पूर्वीप्रमाणे चौका-चौकांत आकडे घेण्याऐवजी जुगारी घरी बसूनच आकडा लावत आहेत.

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 

ठराविक वेळी संकेतस्तळावर निकाल जाहीर होतो. जुगाराची रक्कमही थेट बँक खात्यात जमा होत असल्यामुळे जुगार्‍यांना शोधणे अधिकच अवघड झाले आहे. पूर्वी चहाची टपरी, पानठेला आदी ठिकाणांवर मटका खेळणार्‍यांची गर्दी होत असे, त्यासाठी आकड्यांची बुकिंग घेणार्‍यांची तासनतास वाट पाहावी लागे.

यामध्ये पोलिस कारवाईची भीती होती. त्यामुळे व्यावसायिकांनी नामी शक्कल लढवत मोबाइलच्या साहाय्याने व्यवसाय सुरू ठेवला. 

सांकेतिक भाषेतून व्यवहार

मोबाइलवर सांकेतिक भाषेतून व्यवहार केला जातो. एकसाठी एक्का, पाचला पंजा, सहासाठी छक्का, दोनसाठी दुर्री, सातसाठी 'लंगडा', दहासाठी मेंढी तर चारसाठी चौका असे संबोधतात. तीन एक्के, तीन नव्वे, असे एकसारखे पत्ते आले की त्याला 'संगम पाना' तर 2, 2, 4 किंवा 2, 2, 8 असे आकडे आले, तर 'डीपी पाना' म्हणतात. 1,3,9 किंवा 2,4,9 याला 'सिंगल पाना' म्हणून ओळखतात. 

हेही वाचा  :  ‘कल्याण’ बुकीवर आयजींचा छापा 

पैसे देण्या-घेण्याचा व्यवहारही सांकेतिक भाषेतच होतो. ऑनलाइन लॉटरीप्रमाणेच ऑनलाइन मटक्याचे काम चालते. पण, ऑनलाइन लॉटरीला शासनाची मान्यता आहे. त्यासाठी शासनाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. लॉटरी व्यवसायाचा कर कपातसुद्धा होते 

विश्वासाचा धंदा विश्वासाने

'विश्वासाने' पैसे लावणार्‍या व्यक्तीला आकडे घेणारी व्यक्ती कधीही अधिकृत पावती देत नाही. पण, आकडा खुलल्यानंतर फसवणूक झाल्याचे कुठेच घडले नाही. पूर्वी आकडा हा मातीच्या मडक्यात पत्ते टाकून काढीत असत, म्हणून मडक्याचा हिंदी शब्द 'मटका' असा रूढ झाला. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Gambling on Mobile Now, Youth in Trap